घरCORONA UPDATEभाऊसाहेब हिरे रुग्णालयातील प्रकार : मरणाच्या भीतीने पळताहेत रुग्ण 

भाऊसाहेब हिरे रुग्णालयातील प्रकार : मरणाच्या भीतीने पळताहेत रुग्ण 

Subscribe

कोरोनाचा रुग्ण हा बरा होण्याऐवजी त्याचा मृत्यू होत असल्याने  रुग्णालयामध्ये मरण्यापेक्षा घरी जावे या भीतीने आतापर्यंत रुग्णालयामधून नऊ रुग्ण पळून गेले आहेत. 

कोरोनाच्या उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार मिळत नसल्याने व डॉक्टरांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने रुग्णालयामधून रुग्ण पळून जात असल्याचा प्रकार धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयामध्ये वारंवार घडत आहे. अत्यव्यस्थ असलेला कोरोनाचा रुग्ण हा बरा होण्याऐवजी त्याचा मृत्यू होत असल्याने  रुग्णालयामध्ये मरण्यापेक्षा घरी जावे या भीतीने आतापर्यंत रुग्णालयामधून नऊ रुग्ण पळून गेले आहेत.

धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ५३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील कोरोनाबाधित रुग्णांना भाऊसाहेब हिरे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येते. मात्र रुग्णांना नियमित औषधोपचार मिळत नसल्याने आणि त्यांच्या तपासण्या केल्या जात नसल्याने रुग्ण हतबल होत आहेत. रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेला रुग्णाची परिस्थिती अत्यव्यस्थ झाल्यास त्याच्यावर तातडीने उपाचार करण्यात येत नाहीत. अनेकदा त्यांना व्हेंटिलेटर सुद्धा लावण्यात येत नाही. त्यामुळे रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोरोना धुळ्यातील मृत्यूदर हा १२ टक्के इतका आहे. आतापर्यंत भाऊसाहेब हिरे हॉस्पिटलमध्ये सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असतानाही हॉस्पिटल प्रशासनाकडून रुग्णांवर उपचार करण्यात हलगर्जीपणा दाखवण्यात येतआहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयामधून पळून गेलेल्या नऊ रुग्णांमध्ये २ कोरोनाबाधित तर सात कोरोना संशयित रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि मृतांची वाढणारी संख्या पाहून रुग्णालयामध्ये मरण्याऐवजी घरी जावे असा विचार करून कोरोनाचे रुग्ण पळून जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

कोरोनाने जिल्ह्यामध्ये थैमान घातले असतानांही रुग्णालयामधील वरिष्ठ डॉक्टर हे बेजबाबदारपणे वागत आहेत. रुग्णालयामधील कोरोनाच्या रुग्णांच्या तपासणीसाठी न येता सर्व जबाबदारी नवशिक्या डॉक्टरांवर सोपवणे, परिचारिकांचे रुग्णांसोबत अरेरावीने वागणे, रुग्णांशी हुज्जत घालणे, असे अनेक प्रकार सर्रास घडत आहेत. तक्रार करूनही त्याकडे रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून चांगले उपचार होत नसल्याने बाजूच्या बेडवरील रुग्णाचा त्रास पाहून डोळ्यासमोर उभे राहणारे मरण पाहण्यापेक्षा पळून जाणे रुग्णांना अधिक सीईस्कर वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एकीकडे रुग्णांकडून चांगले उपचार मिळत नसल्याची तक्रार केली जात असताना रुग्णालयामधील कोरोना रुग्णांची सेवा करताना सुरक्षेसाठी आवश्यक असलेले मास्क, ग्लोव्हज, पीपीई किट पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही, त्यामुळे सुरक्षेच्या साधनांविनाच काम करावे लागत असल्यच्ची तक्रार डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांच्याकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -