घरदेश-विदेशशरद पवारांची ४ एप्रिलला चौकशी आयोगासमोर साक्ष

शरद पवारांची ४ एप्रिलला चौकशी आयोगासमोर साक्ष

Subscribe

भीमा-कोरेगाव प्रकरण

भीमा-कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या ४ एप्रिल रोजी चौकशी आयोगासमोर येऊन साक्ष देतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान भीमा-कोरेगाव येथील दंगल ही सुनियोजित असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्यापासून आहे. त्यामुळे यापूर्वीच शरद पवार यांनी आपल्या लेखी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे. शिवाय चौकशी आयोगाने पवारसाहेबांकडे वेळ मागितली होती. त्यानुसार येत्या ४ एप्रिलला शरद पवार हे आयोगासमोर साक्ष देतील, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. मागील मुख्यमंत्र्यांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले. परंतु त्यांनी चौकशी आयोगाला सहकार्य केले नसल्याचा आरोप मलिक यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे लेखी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून देखील तसे कळवले नसल्याची माहिती त्यांनी दिली.

या प्रकरणी संभाजी भिडे आणि मनोहर एकबोटे यांच्यावर आरोप आहेत. याबाबत जी भूमिका आमची विरोधी पक्षात असताना होती तीच भूमिका सत्तेत असताना देखील आहे. चौकशी आयोगाकडून जे काही सत्य समोर येईल ते जनतेला कळेल असे मलिक यावेळी म्हणाले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार हे येत्या ४ एप्रिल रोजी चौकशी आयोगाला सामोेरे जाणार असल्याचे सांगत राज्य चौकशी आयोगाची मुदत ही ८ तारखेला संपणार असली तरी इतर आयोगाप्रमाणे या आयोगालाही सरकारकडून मुदतवाढ दिली जाईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -