घरदेश-विदेशकार अन् बाईकवाल्यांसाठी मोठी बातमी; नितीन गडकरींनी केली घोषणा

कार अन् बाईकवाल्यांसाठी मोठी बातमी; नितीन गडकरींनी केली घोषणा

Subscribe

नितीन गडकरी यांनी वाहनांच्या किमतीबाबत केलेली घोषणा जनतेला दिलासा देणारी आहे. भारतात येणारी वेळ ही इलेक्ट्रिक मोबिलिटीची असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

नवी दिल्ली : तुम्ही कार किंवा बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केलीय. येत्या एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीच्या असतील, असं गडकरी म्हणालेत. एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानानंतर कार आणि दुचाकीस्वार चांगलेच खूश झाले आहेत.

गडकरींची घोषणा जनतेला दिलासा देणारी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणामुळे सरकार आणि लोक इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहेत. महागड्या किमतीमुळे लोकांना हवे असले तरी इलेक्ट्रिक वाहन घेता येत नाही. मात्र नितीन गडकरी यांनी वाहनांच्या किमतीबाबत केलेली घोषणा जनतेला दिलासा देणारी आहे. भारतात येणारी वेळ ही इलेक्ट्रिक मोबिलिटीची असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

- Advertisement -

इलेक्ट्रिक इंधन लवकरच प्रत्यक्षात येणार

तंत्रज्ञान आणि ग्रीन फ्युएलमध्ये झपाट्याने होणारा बदल यामुळे इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्सच्या किमती कमी होतील, असेही नितीन गडकरी म्हणाले. यामुळेच पुढील एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनाची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीची असेल. प्रभावी स्वदेशी इंधनाकडे जाण्याच्या गरजेबद्दल बोलताना गडकरींनी आशा व्यक्त केली की, लवकरच इलेक्ट्रिक इंधन प्रत्यक्षात उतरेल.

हायड्रोजन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा आग्रह

तत्पूर्वी त्यांनी खासदारांना हायड्रोजनच्या पर्यायाचा अवलंब करण्याचे आवाहनही केले. खासदारांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील सांडपाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आगामी काळात हायड्रोजन हा सर्वात स्वस्त इंधन पर्याय असेल. नितीन गडकरी म्हणाले, ‘लिथियम-आयन बॅटरीच्या किमती झपाट्याने खाली येत आहेत. झिंक-आयन, अॅल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरी विकसित केल्या जात आहेत. तो दिवस दूर नाही, जेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटो रिक्षाची किंमत पेट्रोलवर चालणारी स्कूटर, कार, ऑटो रिक्षाच्या बरोबरीची असेल.

- Advertisement -

हेही वाचाः ‘राजकारणासाठी पैसा आणि जात माझ्याकडे नाही’, नांदेडच्या मनसे कार्यकर्त्याची

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -