घरताज्या घडामोडी‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जाते. या ‘बिग बॉस’चे चौथे पर्व असून, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु होणार आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जाते. या ‘बिग बॉस’चे चौथे पर्व असून, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु होणार आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा आणखी एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या इंस्टग्राम अकाऊंटवर हाा प्रोमो शेअर केला आहे. या पर्वात महेश मांजरेकर अगदी हटके भूमिकेत दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर विविध भूमिका साकारताना दिसत आहे. यात महेश मांजरेकर कधी पोस्टमन, कधी अम्पायर, तर कधी शाळेतला कडक मास्तर अशा भूमिकेत दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना त्यांनी बिग बॉस कधीपासून सुरु होणार? याची तारीख जाहीर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

- Advertisement -

“100 दिवसांचा हा खेळ, कधी पास, कधी फेल. पण महेश सरांच्या मते, यंदा ‘All is well’ पाहायला विसरू नका “BIGG BOSS मराठी” Grand Premiere 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम – शुक्र रात्री 10 वा, शनि- रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर!”, असे कॅप्शन कलर्सने या प्रोमोला दिले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान, आता या बिग बॉस मराठीमध्ये कोण कोण कलाकार असणार, पुन्हा तोच राडा होणार का? मैत्री आणि प्रेमाचे वारे वाहणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच बिग बॉस मराठीमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार असल्याचे दिसत आहे. तसेच यात सहभागी होणारे स्पर्धक कोण असणार याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. ‘बिग बॉस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच लोकप्रिय ठरले होते. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा टीझर प्रदर्शित झाला होता.


हेही वाचा – 2 वर्षानंतर होणार माउंट मेरीची यात्रा; महापालिकेची जय्यत तयारी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -