घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचिखलामुळे गेला दुचाकीस्वाराचा जीव; महापालिका प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त

चिखलामुळे गेला दुचाकीस्वाराचा जीव; महापालिका प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त

Subscribe

नाशिक : चिखलमय रस्त्यामुळे दुचाकीचालकाचा नाहक बळी गेल्याची दुदैैवी घटना सोमवारी (दि.२८) सकाळच्या सुमारास अंबड भागातील संजीवनगरमध्ये घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. राजकुमार तुलसीप्रसाद सिंह (वय ४१, रा. श्रमिकनगर, सातपूर) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार सिंह दुचाकी वरून एकटेच संजीव नगरमधून जात होते. येथील रस्ता चिखलमय असल्याने त्यांची दुचाकी अचानक घसरली. त्यानंतर पाठीमागून आलेला भरधाव ट्रक धडकल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना परिसरातील नागरिकांनी उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. दरम्यान, या अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासन व अधिकार्‍यांच्या बेफीकीरीचा तीव्र शब्दांत निषेध केला. महापालिका अधिकार्‍यांनी वेळीच दखल घेत उपाययोजना केली असती तर अपघात टळला असता, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच्या बाजूलाच मोठा खड्डाही आहे.

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी वारंवार मागणी केली आहे. कामगाराच्या मृत्यूला महापालिका प्रशासन आहे. : निवृत्ती इंगोले, स्थानिक नागरिक

- Advertisement -

दुचाकी स्लीप; चालक ठार

दिंडोरी रस्त्यावर दुचाकी स्लीप झाल्याने दुचाकीचालक ठार झाल्याची घटना दिंडोरीमध्ये रविवारी (दि.२८) घडली. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नवीन त्रिपाठी असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन त्रिपाठी हे दुचाकीवरून दिंडोरी रोडने नाशिकहून रतनाळेच्या दिशेने जात होते. त्यावेळी दुचाकी स्लीप झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -