घरमहाराष्ट्रसत्तारांचे समर्थन नाहीच, मग राऊतांवर गुन्हा दाखल का नाही? चित्रा वाघ यांचं...

सत्तारांचे समर्थन नाहीच, मग राऊतांवर गुन्हा दाखल का नाही? चित्रा वाघ यांचं विरोधकांवर टीकास्त्र

Subscribe

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. राज्यभरात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तारांविरोधात आंदोलने करत आहेत. राष्ट्रवादीच्या या आक्रमक कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यातच भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांची आठवण करून दिली आहे. चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करणारा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. (bjp chitra wagh slams shiv sena sanjay raut on abdul sattar controversial statement on supriya sule)

चित्रा वाघ म्हणाल्या की, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच. पण महिलांचा अपमान झाल्यावर निवडक नेत्यांविरोधात संताप कितपत योग्य? कंगना रनौत, स्वप्नाली पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठवला नाही? महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थन नाहीच. सगळ्यांनीच भान ठेवा. असही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊतांचा उल्लेख करत चित्रा वाघ म्हणाल्या की, गेल्या अडीच वर्षांत काही का केलं नाही? संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत? एका अभिनेत्रीला हरामखोर म्हणणं हे योग्य आहे का? स्वप्ना पाटकर महाराष्ट्रातील मुलगी नव्हती का? त्यांच्यावर बोलल्यानंतर संजय राऊतांवर का गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मागील सरकारमध्येही अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. तेव्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाला म्हटलं होतं की, मुख्यमंत्र्यांची, मंत्र्यांची गरिमा तुम्ही ठेवायला हवी. भाजपा वाट्टेल तसे बोलते. तसंच इथेही आहे. तुम्हीही मंत्र्यांची गरिमा ठेवायला हवी, ते मंत्री आहेत. त्यांच्या खात्याशी संबंधित काही असेल तर तुम्ही नक्की बोला, तुम्ही त्यांना जे बोललात, त्याला ते प्रत्युत्तर आलं आहे, अर्थात, या गोष्टीला माझं समर्थन नाही, असही चित्रा वाघ म्हणाल्या.

- Advertisement -

चित्रा वाघ म्हणाल्या की, प्रत्येक महिलेचा आदर- सन्मान व्हायला हवा, महिलांनीही बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे. पुरुषांनी तर सन्मानचं केला पाहिजे. पण मी महिला आहे म्हणून मी वाटेल ते बोलेन आणि त्याला जर उत्तर आलं तर महिलांची अस्मिता दुखावली गेली असं म्हणत असाल तर ते योग्य नाही, दोघांनीही एकमेकांचा आदर सन्मान ठेवायला हवा, उत्तराला प्रत्युत्तर असतं, असही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.


हेही वाचा : प्रेक्षकांना मारझोड करणं कोणती संस्कृती? राष्ट्रवादीला मनसेचा सवाल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -