घरमहाराष्ट्रभाजप नगरसेवकाच्या तोंडाला युवासेनेने काळे फासून केली मारहाण

भाजप नगरसेवकाच्या तोंडाला युवासेनेने काळे फासून केली मारहाण

Subscribe

भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांना आज दुपारी १.३० वाजताच्या सुमारास युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारजवळ तोंडाला काळे फासले. यानंतर त्यांना मारहाण देखील करण्यात आली. प्रदीप रामचंदानी हे सतत शिवसेना व त्यांच्या वरीष्ठ नेत्यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर वक्तव्य करीत होते, यामुळे स्थानिक शिवसेना नेते आधीच संतप्त झाले होते, याचा वचपा आज शिवसेनेने काढला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील वक्तव्याचे पडसाद उल्हासनगरमध्ये ही उमटू लागले आहेत. उल्हासनगर शहर युवासेना पदाधिकाऱ्यांनी भाजपचे स्विकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्या तोंडाला काळे फासले व मारहाण केली यावेळी प्रदिप रामचंदानी यांचा मुलगा रोहित रामचंदानी याने वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी घटनास्थळी दाखल होत कारवाई सुरू केली. या घटनेनंतर आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड, उप महापौर भगवान भालेराव, नगरसेवक राजेश वधारिया, शेरी लुंड, राजू जग्यासी, प्रकाश माखिजा, कपिल अडसूळ यांनी घटनास्थळी दाखल होत प्रदिप रामचंदानी याना तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.

का झाला प्रदिप रामचंदानीवर हल्ला

या घटनेनंतर प्रदिप रामचंदानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सोशल मिडियावर शिवसेनेच्या विरोधात पोस्ट टाकत असल्याचे सांगितले. तसेच मला अनेक वेळा मारा तरी मी मागे हटणार नाही, तसेच उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुखांच्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी करत असल्याने आपल्यावर हा हल्ला झाल्याचे रामचंदानी यांनी स्पष्ट केले

- Advertisement -

ही बाळासाहेबांचीच शिवसेना – बाळा श्रीखंडे

सोशल मीडियावर प्रदिप रामचंदानी हा शिवसेनेला लक्ष्य करताना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, असे म्हणतो. त्याला आज आम्ही कधीच विसरणार नाही, अश्या पद्धतीने समजावून सांगितले की तो पुन्हा शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असे म्हणणार नाही, असे वक्तव्य युवा सेनाधिकारी बाळा श्रीखंडे यांनी केली. हा नगरसेवक हा फाईल चोर नगरसेवक आहे, त्याने यापुढे शिवसेनेबद्दल तोंड सांभाळून बोलावे नाही तर आणखी वाईट परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा युवासेनेने दिला आहे.

दरम्यान प्रदीप रामचंदानी यांना काळे फासणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सुरू आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -