घरताज्या घडामोडीBJP : चित्रा वाघ आता राष्ट्रीय राजकारणात, राणे वेटिंगवर

BJP : चित्रा वाघ आता राष्ट्रीय राजकारणात, राणे वेटिंगवर

Subscribe

चित्रा वाघ आता राष्ट्रीय राजकारणात, राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातून चौघांची निवड

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारणीत संधी दिली आहे. महाराष्ट्रातून यंदा पहिल्यांदाच सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, हिना गावित, चित्रा वाघ यांना संधी देण्यात आली आहे. जेपी नड्डा यांनी ८० जणांची जम्बो टीम जाहीर केली. महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुनील देवधर आणि पंकजा मुंडे यांना कायम ठेवण्यात आले आहे. नव्या कार्यकारणीसोबतच नवीन जबाबदारीही देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सीटी रवी, ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग, पवैय्या यांची नियुक्ती कायम ठेवली आहे. आज जाहीर झालेल्या कार्यकारणीत सदस्य, प्रवक्ते, सचिव, कार्यालयीन सचिव आणि कोषाध्यक्ष ते राज्य प्रभारींचा समावेश आहे. महाराष्ट्रातून एकुण १५ जणांचा समावेश आहे. यंदा चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

महाराष्ट्रातील कार्यकारणीत कोणाचा समावेश ?

महाराष्ट्रातून यंदा पहिल्यांदाच चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून सुनिल वर्मा, हिना गावित यांना संधी देण्यात आली आहे. तर माजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, डॉ विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विनोड तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणींचा समावेश आहे. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

चित्रा वाघ इन

महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीत चित्रा वाघ यांच्या निवडीमुळे आता महाराष्ट्रातून निवड झालेल्या महिला भाजप नेत्यांची संख्या दोन झाली आहे. याआधीच पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली होती. त्यापाठोपाठच चित्रा वाघ यांच्या समावेशामुळे महाराष्ट्रातील महिला आघाडी भक्कम झाली आहे. महाराष्ट्रात चित्रा वाघ यांनी संजय राठोड प्रकरणात केलेले पाठपुरावा, महाराष्ट्रातील महिला अत्याचाराचे सातत्याने मांडलेल्या विषयामुळेच त्यांना राष्ट्रीय पातळीवर ही मोठी संधी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय कार्यकारीणीची सदस्य म्हणून नविन जबाबदारी दिल्याबद्दल महाराष्ट्र भाजपते त्यांनी आभार मानले आहेत. तसेच विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांचेही त्यांनी आभार मानले आहेत. तसेच प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेही आभार मानले आहेत.

- Advertisement -

राणेंना संधी नाही

नारायण राणे यांना राष्ट्रीय कार्यकारणीत संधी मिळालेली नाही. नारायण राणे यांना जन आशीर्वाद यात्रेत झालेली अटक भोवली आहे. राष्ट्रीय पातळीवर नवनिर्वाचित मंत्र्यांच्या नेमणूकीनंतर या खासदारांनी आपआपल्या राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढली होती. पण यात्रेदरम्यानच नारायण राणेंना अटक करण्यात आली. त्यामुळेच भाजपची या संपुर्ण प्रकरणात कोंडी झाली होती.


हेही वाचा – जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -