Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तर ट्रकभर एसआयटी कराव्या लागतील - अँड.आशिष शेलार

तर ट्रकभर एसआयटी कराव्या लागतील – अँड.आशिष शेलार

Related Story

- Advertisement -

गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे..पुजा चव्हाणचा मृत्यू..अशा ट्रकभर “एसआयटी” कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळे यांना ट्विटच्या माध्यामातू लक्ष्य केले आहे. नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय ! असाही दावा आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. सुप्रिया सुळे यांनी गणेश नाईक यांचे आंतरराष्ट्रीय डॉनसोबत असलेल्या संबंधांची विशेष चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीला भाजपकडून उत्तर येतानाच आता नवी मुंबई निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच विजय खेचून आणेल असाही दावा त्यांनी केला आहे.


सरकारमध्ये मांडीला मांडी लावून आणि पालिकेत विरोधात कसे ?

- Advertisement -

गेल्या महापालिका निवडणुकीत मुंबईत भाजपाला वाँर्ड रचनेमुळे मोठे यश मिळाले, असा जावई शोध चार वर्षांनी काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने लावला? सत्यच शोधायचे तर मग 40 नगरसेवक असताना महापालिकेत विरोधीपक्ष नेतेपद कसे मिळाले? सरकारमधे मांडीला-मांडी लावून आणि पालिकेत विरोधात कसे? असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. कॉंग्रेस शिवसेनेच्या युतीबाबत त्यांनी परखड असा सवाल केला आहे. मुख्यत्वेकरून कॉंग्रेसकडे असणाऱ्या विरोधी पक्षनेते पदावर त्यांनी हल्लाबोल केला आहे. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद कॉंग्रेसकडेच राहणार असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. भाजपने आता याच मुद्द्यावर पालिकेतील शिवसेना कॉंग्रेस युतीवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेत समुद्राचे पाणी गोडे करण्यासारखे मोठे प्रस्ताव आले की शिवसेनेसोबत मिलीभगत कशी होते? नालेसफाई, एसटीपी पासून मलईदार विषयात काँग्रेस, शिवसेनेची युती कशी होते? असाही सवाल आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे. सध्याचे कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेता रविराजा यांना लक्ष्य केले आहे. उजेडात सुरु असलेल्या या तुमच्या काँग्रेसी “रवीराज” चे सत्यशोधन आता आम्ही करु जनतेसमोर!
“नाचता येईना अंगण वाकडे”! असा टोमणा त्यांनी लगावला आहे. एकुणच कॉंग्रेस आणि शिवसेनेत सुरू असणाऱ्या मिलिभगतीचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. त्यानिमत्ताने भाजपकडून हुकलेल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निमित्तानेही त्यांनी चांगलाच टोला हाणला आहे.


 

- Advertisement -