घर महाराष्ट्र नाशिक शरद पवारांबाबत भाजपच्या मंत्र्याने केला खळबळजनक दावा, म्हणाले - "आम्हाला गाफील ठेवून.."

शरद पवारांबाबत भाजपच्या मंत्र्याने केला खळबळजनक दावा, म्हणाले – “आम्हाला गाफील ठेवून..”

Subscribe

2019 साली शरद पवार यांनी दिल्लीत भाजपबरोबर 4 वेळा बैठका घेतल्या. पण, ऐनवेळी आम्हाला गाफील ठेवून घात केला, अशी माहिती आता भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आली आहे.

नाशिक : शरद पवार हे राजकारणातील मुत्सद्दी नेते आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्याच नाही तर देशातील राजकारणात त्यांना एक वेगळे स्थान आहे. परंतु सध्या त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मोठी खिंडार पडल्याने त्याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्याबाबत अनेत गौप्यस्फोट करण्यात येत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यास निघाले होते. पहाटेचा शपथविधी देखील पवारांच्याच सांगण्यानुसार झाला होता, असे अजित पवार यांच्या गटातील नेत्यांकडून अनेकदा सांगण्यात आले आहे. अशातच आता भाजपच्या मंत्र्यांने शरद पवार यांच्याबाबत दावा केल्याने राजकीय वर्तुळात शरद पवारांकडून करण्यात येणाऱ्या राजकारणाची नव्याने चर्चा रंगली आहे. ( BJP minister Girish Mahajan made a sensational claim about Sharad Pawar)

हेही वाचा – अजित पवारांचा फडणवीस यांच्या खात्यात हस्तक्षेप; ऊर्जा विभागाशी संबंधित कामाचा घेतला आढावा

- Advertisement -

2019 साली शरद पवार यांनी दिल्लीत भाजपबरोबर 4 वेळा बैठका घेतल्या. पण, ऐनवेळी आम्हाला गाफील ठेवून घात केला, अशी माहिती आता भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आली आहे. नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना महाजनांकडून हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, 2014 ते 2019 दरम्यान शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. ‘तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठिशी आहे’ असे शरद पवारांनी सांगितले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी दिल्लीत भाजपाबरोबर 4 वेळा बैठका घेतल्या.

तसेच, बैठकांमध्ये सगळं ठरलं होतं. शरद पवार यांची आमच्याबरोबर चर्चा सुरू होती. मात्र, ऐनवेळी आम्हाला गाफील ठेवून शरद पवारांनी घात केला, असा आरोप महाजन यांच्याकडून करण्यात आल्याने शरद पवार यांच्याबाबत विविध चर्चा केली जात आहे. तर हाच आरोप याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही करण्यात आला होता. त्यामुळे शरद पवार हे खरंच भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन करणार होते का? याबाबत विविध चर्चा करण्यात येत आहे.

- Advertisement -

तर काल (ता. 10 सप्टेंबर) कोल्हापुरात अजित पवार यांची प्रत्युत्तर सभा पार पडली. शरद पवार यांनी कोल्हापुरात सभा घेतल्यानंतर त्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवारांकडून ही सभा घेण्यात आली. या सभेमध्ये पुन्हा अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकांची कामे करण्यासाठी आमच्यावर दबाव होता. काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरात बसता येत नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडत होते. तेव्हा सत्तेत सहभागी होण्याबाबत 52 आमदारांच्या सहीचे पत्र दिले होते. हे जर खर नसेल, तर मी राजकारणातून निवृत्त होईन. खर असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे.

- Advertisment -