घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुसंस्कृत, सभ्य राहिले नाहीत; अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुसंस्कृत, सभ्य राहिले नाहीत; अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

Subscribe

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुसंस्कृत, सभ्य राहिले नाहीत, असे मोठे विधान भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ‘आपलं महानगर’च्या खुल्लम खुल्ला या कार्यक्रमात बोलाताना केले. उद्धव ठाकरे सुसंस्कृत, सभ्य आहेत असे मला वाटत होते. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे वर्तन सुसंस्कृत, सभ्य राहिलेले नाही. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला कार्टून शेअर केले म्हणून त्याच्या घरात जाऊन मारहाण केली. या मारहाणीचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुसंस्कृत, सभ्य वाटत असतील तर संविधानाच्या दिवशी वापरलेली भाषा महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला.

अतुल भातखळकर यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाविषयी केलेल्या ट्विटमध्ये युवा नेत्याचा उल्लेख केला होता. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुमचीही मुलंबाळं आहेत, असा इशारा दिला आहे. यावर बोलताना अतुल भातखळकर यांनी आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही स्वत: सांगतो आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या चौकश्या करा. आम्ही काही परदेशातून आलोय सांगून क्वारंटाईन होणार नाही, असा टोला देखील भातखळकर यांनी सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना लगावला. पुढे बोलताना अतुल भातखळकर म्हणाले, राज्य सरकारकडे पोलीस आहेत करा चौकश्या, असे खुले आवाहन अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला दिले.

- Advertisement -

आम्ही सत्तेत असताना विरोधी पक्षाने असा आरोप केला होता की आम्ही परदेशातून विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करत होतो. त्यानंतर आता यांचे राज्य येताच राज्याच्या गृहमंत्र्यांनी चौकशी करु अशी घोषणा केली. त्या चौकश्यांचा काय झाले, ते राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करणार आहे, अशी घोषणा केली. त्या चौकशीचे काय झाले? आमच्या पाच वर्षांच्या कालखंडातल्या मंत्र्यांच्या निर्णयाची चौकशी करायला मोकळे आहात. आम्ही स्वागत करतो. त्यामुळे आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही, असे अतुल भातखळकर म्हणाले.

मी रोडछाप भाषा वापरत नाही

माझ्या सुरक्षेची चिंता मला नाही आहे. जनतेच्या सुरक्षेची चिंता करा. मी सुरक्षा कधी मागणार नाही. मी कुठलेही गैर कृत्य करत नाही. लोकशाहीमध्ये टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. मी कोणावरही व्यक्तिगत टीका करत नाही. पातळी सोडून टीका केलेली नाही. राज्य सरकारच्या अपयशावर बोट ठेवतोय. मी धोरणांवर, पदांवर आहेत त्यांच्या कृतींवर टीका करत राहणार. मी उद्धव ठाकरेंच्या द्वेषाने पछाडलेलो नाही. मी रोडछाप भाषा वापरत नाही त्यामुळे मला माझ्या सुरक्षेची चिंता वाटत नाही, असे अतुल भातखळकर म्हणाले.

- Advertisement -

उपनगराचे पालकमंत्री उपनगरात कधी आलेच नाहीत

‘आपलं महानगर’ला दिलेल्या मुलाखतीत मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अतुल भातखलकर यांनी निशाणा साधला. उपनगराच्या पालकमंत्र्यांनी उपनगरात आले पाहिजे. उपनगरात प्रवास केला पाहिजे. क्वारंटाईन सेंटरला आम्ही भेटी दिल्या. मृतदेहांची अदलाबदली झाली, मृतदेह गायब झाले. किती गोष्टी घडल्या. मग पालकमंत्र्यांनी भेटी द्यायला नको का? असा सवाल करत भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

मुंबईतील विकासकामे आम्ही केली

आम्हाला मुंबईवर कब्जा करायचा नाही आहे. तर मुंबईच्या जनतेची आम्हाला सेवा करायची आहे. मुंबईतील विकासकामे आम्ही केली. १९९७ सालापासून नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असे ऐकत आलो. तो प्रकल्प आम्ही मार्गी लावला. मेट्रोची कामे आम्ही केली. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये सर्वांना घरे मिळावीत यासाठी आम्ही कायदा केला, असे म्हणत अतुल भातखळकर यांनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधला. मुंबई महानगरपालिका आम्ही जिंकणार असा विश्वास देखील अतुल भातखळकर यांनी बोलून दाखवला.

 

#Live : मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा!

#Live : मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा!

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Thursday, November 26, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -