घरमहाराष्ट्र'मी भरपूर खाज असलेला खासदार'; ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाच्या वादावर उदयनराजेंचं विधान

‘मी भरपूर खाज असलेला खासदार’; ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाच्या वादावर उदयनराजेंचं विधान

Subscribe

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन केलं. यावेळी उदयनराजे यांनी काही वादग्रस्त विधआनं केली आहेत. ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावर भाष्य करताना उद्घाटनासाठी मंत्री कशाला हवे आहेत? मी खासदार आणि भरपुर खाज असलेला खासदार आहे, असं विधान उदयनराजे यांनी केलं. याशिवाय, त्यांनी मुलं व्हायला पण नऊ महिने लागतात. हे तर ग्रेड सेपरेटरचं काम आहे, त्याला वेळ लागणारच, असं वादग्रस्त वक्तव्य उदयनराजेंनी केलं.

साताऱ्यातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात आलं आहे. या ग्रेड सेपरेटरचं उद्घआटन उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना “मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं असा काही कायदा आहे का? ते मंत्री असले तरी आधी आमदार आणि खासदार आहेत ना?! मी सुद्धा खासदार आहे आणि असा तसा नाही. भरपूर खाज असलेला खासदार आहे,” असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं. पुढे त्यांना ग्रेड सेपरेटरच्या कामाला का उशीर झाला असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. “काम करताना…एक लक्षात घ्या…थोडा त्रास होणारच. पोरंही एका दिवसात होत नाहीत. नऊ महिने लागतात…त्रास तर होतोच… त्रास झाल्याशिवाय मुलंही होत नाहीत… हे तर ग्रेड सेपरेटर आहे, थोडा त्रास सहन करावाच लागतो,” असं वादग्रस्त वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं. उदयनराजे भोसले यांनी ८ जानेवारी ग्रेड सेपरेटरच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळई त्यांनी फित कापून रस्ता खूला केल्याचं जाहीर केलं होतं. आजपासून हा रस्ता जनतेसाठी खुला झाला आहे, असं घोषित केलं होतं.

- Advertisement -

हेही वाचा – रोह्यात राष्ट्रवादी-शेकापला पारंपारिक ग्रामपंचायतींमध्ये धक्का; सेना-भाजपची एन्ट्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -