घरमहाराष्ट्रआम्ही ठाकरेंच ऐकलं नाही, तर तुमचं.... राणेंचा केसरकरांवर संताप

आम्ही ठाकरेंच ऐकलं नाही, तर तुमचं…. राणेंचा केसरकरांवर संताप

Subscribe

बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कोकणातील आमदार दिपक केसरकर यांनी अलीकडेच पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उल्लेख करत मोठा खुलासा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते. असे केसरकर म्हणाले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत त्यांनी राणे कुटुंबावर हल्ला चढवला. यानंतर आता नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत केसकरांना प्रत्युत्तर दिले आहे. ज्यामुळे आता राणे – केसरकर यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेल्याचे दिसतेय. सातत्याने राणे कुटुंबियांकडून केसकरांवर जहरी टीका केली जातेय.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राणे पिता पुत्राने आदित्य ठाकरेंची बदनामा केल्याचा आरोप दीपक केसरकरांनी पत्रकार परिषद घेत केला. यानंतर राणे पिता पुत्र चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नितेश राणेंनी यावर बोलणं टाळलं पण निलेश राणे चांगलेच भडकल्याचे दिसून आले. आम्ही केव्हा ठाकरेंच ऐकल नाही तर तुमचं ऐकणं सोडूनचं द्या. तुम्हाला एवढीच राणेंसोबत काम करण्याची हौस असेल तर 1 तारीखपासून ड्रायव्हरची नोकरी रिकामी होतेय. तुम्ही जॉईंट व्हा. असा शब्दात निलेश राणेंनी केसरकरांवर जहरी प्रहार केला आहे.

- Advertisement -

दिपक केसरकर कधी येणार आणि आम्ही काम करणार, यासाठी आम्ही थांबलो होतो का? केसरकर स्वत:ला जरा जास्तचं महत्त्व देतात, त्यांचे एवढं महत्त्व केव्हाचं नव्हतं आणि आता तेही शिल्लक राहिले नाही. केसकरांनी स्वत:ची लायकी ओळखावी, ते कदाचित विसरले असतील, अशा शब्दात निलेश राणेंनी केसरकरांवर हल्ला केला आहे.

मला वाटतं केसरकरांना मानसिक रोग झाली आहे. एक दिवस ठाकरे कुटुंबाबाबत चांगले बोलतात, दुसऱ्या दिवशी त्यांच्याविरोधात बोलतात. केसरकरांचा वरचा माळा रिकामी झाला किंवा काहीतरी गडबड झाली आहे. अशी जहरी टीका करत निलेश राणेंनी दीपक केसरकरांना लायकीत राहण्याचा सल्ला दिला.

- Advertisement -

राणेंना नख लावाल तर तुम्हाला फाडून टाकणार एवढं लक्षात ठेवा, आमच्या भानगडीत पडू नका, तुमची मतदारसंघात काय लायकी आहे, ते आम्हाला माहिती आहे, कदाचित मी मुंबईत माहिती नसेल. असं निलेश राणे म्हणाले आहेत. या वादानंतर अखेर दिपक केसरकरांनी आपण राणे कुटुंबियांवर बोलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.


मुकेश अंबांनींनी दोन वर्षे पगारच घेतला नाही, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -