घरमहाराष्ट्रभाजपचे प्रसाद लाड 152 कोटींचे मालक, प्रवीण दरेकरांच्या संपत्तीत भरमसाठ वाढ

भाजपचे प्रसाद लाड 152 कोटींचे मालक, प्रवीण दरेकरांच्या संपत्तीत भरमसाठ वाढ

Subscribe

विविध स्वरूपाचे 14 गुन्हे दाखल असलेल्या प्रवीण दरेकरांचीही गेल्या सहा वर्षांत संपत्ती दुपटीनं वाढली आहे. तसेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवणारे प्रवीण दरेकर यांनी प्रतिज्ञापत्रात व्यावसायिक असल्याचा उल्लेख केला आहे.

मुंबईः राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज म्हणजेच 10 जून रोजी निवडणूक होत आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपनं अधिकचा उमेदवार दिल्यानं सुंदोपसुंदी वाढली आहे. भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांनी आपले अर्जदेखील भरले आहेत. त्यावेळी उमेदवारी अर्जात संपत्तीही जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलंय. प्रसाद लाड हे जवळपास 152 कोटी रुपयांचे मालक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय.

विविध स्वरूपाचे 14 गुन्हे दाखल असलेल्या प्रवीण दरेकरांचीही गेल्या सहा वर्षांत संपत्ती दुपटीनं वाढली आहे. तसेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढवणारे प्रवीण दरेकर यांनी प्रतिज्ञापत्रात व्यावसायिक असल्याचा उल्लेख केला आहे.

- Advertisement -

भाजपचे उमेदवार प्रसाद लाड हे क्रिस्टल कंपनीचे संचालक आहेत. तसेच ते मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकही आहेत. विधान परिषदेची पुन्हा उमेदवारी मिळालेल्या प्रसाद लाड यांची पूर्वी मालमत्ता 201 कोटी होती. ती आता कमी होऊन 152 कोटी झाली आहे. यात घरं, व्यापारी गाळे आणि जमिनींचा समावेश आहे. प्रसाद लाड यांचे एमबीएपर्यंचे शिक्षण पूर्ण झाले आहे. प्रसाद लाड यांची जंगम मालमत्ता 32 कोटी 59 लाख आहे, तर पत्नीच्या नावे 54 कोटी 65 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावे 74 लाखांची संपत्ती आहे. त्यात दोन हजार 24 कॅरेटे सोने, 12 महागडी घड्याळं, हिरे, चांदीचा समावेश आहे.

प्रवीण दरेकरांच्या संपत्तीत भरमसाठ वाढ

प्रवीण दरेकर यांची संपत्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रवीण दरेकरांची संपत्ती 7 कोटी 46 लाखांहून अधिक आहे. दरेकर यांच्याकडे 2 कोटी 30 लाखांची स्थावर मालमत्ता आहे, तर पत्नीच्या नावे 4 कोटी 18 लाखांची मालमत्ता आहे. या मालमत्तेत मुंबईतली व्यापारी गाळे, घरांचाही समावेश आहे. तसेच प्रवीण दरेकरांवर शिवसह्याद्री पतपेढीची 29 लाखांचं कर्जही आहे. सहा वर्षांपूर्वी प्रवीण दरेकरांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची 1 कोटी 81 लाखांची जंगम मालमत्ता होती, तर 2 कोटी 29 लाखांची स्थावर मालमत्ता मिळून 4 कोटींची संपत्ती होती. ती आता 7 कोटींच्या वर गेली आहे.

- Advertisement -

हेही वाचाः मलिकांना मतदानासाठी तूर्त परवानगी नाहीच; फेरविचारासाठी पुन्हा याचिका करणार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -