घरमहाराष्ट्रभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे घेणार राज ठाकरेंची भेट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे घेणार राज ठाकरेंची भेट

Subscribe

मुंबई – राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्यात सागर बंगल्यावर तासभर खलबते झाल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान काल भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी शिवतीर्थवर जाऊन राज ठकरेंची भेट घेतली होती.

भाजप आणि राज ठाकरेंच्या भेटी वाढणे हे भाजप- मनसेच्या युतीचे संकेत राजकीय वर्तुळात मानले जात आहेत. दोन्ही पक्षांमध्ये महापालिका निवडणुकीला सामोरे जातानाच्या रणनितीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीचे वृत्त दोव्ही पक्षांच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले होते.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट? –

शिवसेनेत फूट पडल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत अस्थिर राजकीय वातावरणाचा पक्षाला कसा फायदा होईल यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी निवडणुकीत भाजपसोबतच्या युतीबाबतची चाचपणी करण्यासाठी सोमवारी सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्यात सागर बंगल्यावर गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यापूर्वी सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीला देवेंद्र फडणवीस गेले होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आल्याचे कारण दिले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -