घरमहाराष्ट्रBJP vs Thackeray group : ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे..., भाजपाने ठाकरे...

BJP vs Thackeray group : ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे…, भाजपाने ठाकरे गटाला सुनावले

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणदौरा केला होता. चिपळूण येथे काल, सोमवारी झालेल्या सभेत त्यांनी भाजपावर हल्लाबोल करताना त्यांच्या हिंदुत्वावर टीका केली होती. आता भाजपाने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ‘बेपत्ता’; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होते. तेथे झालेल्या प्रत्येक सभेत त्यांच्या निशाण्यावर भाजपाच होता. धर्माधर्मात आगी लावणारे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. तसेच शिवसेनेच्या हिंदुत्वावर कुणीही शंका घेऊ नये. रायगडातील मुस्लीम बांधवांनी मराठीतील कुराण आपल्याला भेट दिले, हेच आमचे हिंदुत्व आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्याचे जे म्हणत आहेत. त्यांना मी कमळाबाई म्हणतो. कमळाबाई हा शब्द माझा नाही तर, बाळासाहेबांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घराणेशाहीच्या विरोधात जे टाहो फोडत आहेत, पण मी घराणेशाहीवाला आहे, बाळासाहेबांचे विचार माझ्याकडे आहेतच, असे ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – BJP vs Thackeray group : भाजपा हा भ्रष्टाचाऱ्यांचा कुंटणखाना, ठाकरे गटाचा हल्लाबोल

सन 2014मध्ये मीच पक्षप्रमुख होतो, आत्ताचे जे सांगत आहेत की हे पक्षप्रमुखच नाहीत. मग तुम्ही पाठिंबा कुणाचा घेतला होता? 2019मध्ये मला तुम्ही का बोलवले होते? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मातोश्रीवर कशासाठी आले होते? त्यावेळी ते मिंध्याकडे का गेले नाहीत? तेव्हा घराणेशाहीबाबत हे का बोलले नाहीत? कारण, हे त्यांचे ढोंग आहे. ते जय श्री राम म्हणतात मी त्यांना हरामखोरपणा म्हणतो, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

याच अनुषंगाने महाराष्ट्र भाजपाने ट्वीट केले आहे. जय श्रीरामचे उत्तर समोरून शिवी रुपात येणे हाच तर ठाकरे गटाचा हिंदुत्व सोडल्याचा पुरावा आहे. उद्या आम्ही हर हर महादेव म्हटल्यावर अजून दुसरी कुठली तरी शिवी द्याल आणि हेच आमचे हिंदुत्व म्हणाल! ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, त्याचा अभिमान कसला बाळगता? असा बोचरा सवाल भाजपाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -