घरमहाराष्ट्रवाघाला दगड मारला तर तो नरडीचा घोट घेतो, सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादी...

वाघाला दगड मारला तर तो नरडीचा घोट घेतो, सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

Subscribe

कुत्र्याला दगड मारला तर तो दगडाचा चावा घेतो. मात्र, वाघाला दगड मारला तर तो नरडीचा घोट घेतो, असे म्हणत सदाभाऊचा प्राण घेला तरी चालेल. मात्र, तुमचा मस्तवाल वाडा पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. सदाभाऊ खोतांनी बिल दिले नाही, म्हणून हॉटेलमालकाने खोतांचा ताफा अडवला होता. याप्रकरणी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या संबंधी तक्रार करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

संबंधित व्यक्ती गुन्हेगार –

- Advertisement -

यावेळी सदाभाऊ खोत यांनी संबंधित व्यक्तीचे हॉटेलच नाही. अशोक शिनगारे याला मी ओळखतच नाही. शिनगारे या व्यक्तीचे हॉटेलच नाही, असा दावा खोत यांनी केला. 2014 नंतर 20 ते 25वेळा सांगोल्याचा दौरा केला. मात्र, ही व्यक्ती कधीही भेटली नाही. कोण-कोण जेवले याविषयी त्याला काहीच माहिती नव्हती. मात्र, गोंधळ घातला त्यावेळी सर्व मीडिया त्याठिकाणी सज्ज होता, असे म्हणत अशोक शिनगारे गुन्हेगार असल्याचा आरोप त्यांनी केला. कर्नाटकमध्ये त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल आहे. 2021मध्येही त्याच्यावर गुन्हा दाखल, 420, 138 नुसारही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. यासह विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती खोतांनी दिली.

याविषयी तक्रार करणार –

- Advertisement -

त्यांच्या फोनवर कोणाचे संभाषण झाले, कोण कोण यात सहभागी आहे. याचे फोन रेकॉर्ड तपासावेत. पोलिसांनी 353खाली गुन्हा दाखल करावा. मात्र, पोलीस गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. तो माफी मागत आहे तर कशाला गुन्हा दाखल करायचा, असे पोलिसांचे म्हणणे होते. सातत्याने राष्ट्रवादीचे नेते लक्ष्य करत असल्याची तक्रार गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. राष्ट्रवादी गुन्हेगारांना पाठी घालत असून कुभांड रचून आम्हाला आयुष्यातून उठवण्याचा डावा कधीच यशस्वी होऊ देणार नाही. 21,22 तारखेला कार्यकारिणी आम्ही बोलावली आहे. आता संघर्ष अटळ आहे, असा इशारा त्यांनी दिला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -