घरताज्या घडामोडीअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला अंतरिम स्थगिती; उच्च न्यायालयाचा आदेश

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीला अंतरिम स्थगिती; उच्च न्यायालयाचा आदेश

Subscribe

मागील काही वर्षांपासून विविध वादांमुळे चर्चेत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूक कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. निवडणुकीसाठी पात्र मतदारांची निश्चिती न करताच निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला, असा आक्षेप घेत काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

मागील काही वर्षांपासून विविध वादांमुळे चर्चेत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणूक कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. निवडणुकीसाठी पात्र मतदारांची निश्चिती न करताच निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला, असा आक्षेप घेत काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यातच न्यायमूर्ती गौतम पटेल व न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने राज्य सरकार व कोल्हापूर धर्मादाय सहआयुक्तांकडून उत्तर मागितले असून, पुढील सुनावणी १८ जानेवारीला ठेवली. तोपर्यंत सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निवडणूक अधिकारी व धर्मादाय सहआयुक्तांच्या अन्य अधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम थांबवण्याचे अंतरिम आदेश खंडपीठाने दिला आहे. (Bombay High Court Stay Order On Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal Election)

नृत्यदिग्दर्शक योगेश देशमुख व अन्य तिघांनी अॅड. युवराज नरवणकर यांच्यामार्फत याप्रश्नी याचिका केली आहे. चित्रपट महामंडळाच्या सदस्यांची गट अ, ब, आजीवन सदस्य, निर्मिती कंपनीतील सदस्य व मानद सदस्य अशा पाच प्रकारांत वर्गवारी केली आहे. त्यातील ‘अ’ गटातील सदस्यांना महामंडळातील कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो. माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोणत्याही सदस्याला ‘ब’ गटामध्ये प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सदस्यत्व मिळते. त्याच्या सदस्यत्वाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला ‘अ’ गटाचं सदस्यत्व मिळते. त्यासाठी कार्यकारी मंडळाची मान्यता आवश्यक असते.

- Advertisement -

याचिकाकर्त्यांसह अनेकांनी ‘अ’ गटाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केले आहेत. मात्र मागील पाच वर्षांत झालेल्या वादांमुळे ते सारे प्रलंबित आहेत. दरम्यान, महामंडळाच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपल्याने 2022-23 ते 2027-28 या कालावधीसाठी निवडणूक घेण्याचा आदेश सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी 19 सप्टेंबर 2022 रोजी दिला आहे. त्याकरता निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्तीही झाली. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी पात्र मतदारांची शहानिशा न करताच आणि ‘अ’ गटातील मतदारांची निश्चिती न करताच 5 डिसेंबर रोजी निवडणूक जाहीर केली.

दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १६ जानेवारी अंतिम मुदत असून अंतिम उमेदवारांची नावे २१ जानेवारी जाहीर होणार आहेत. तर मतदान ५ फेब्रुवारी रोजी होऊन अंतिम निकाल ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिकमधील शिर्डी- सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -