घरठाणेटीएमटीची पारसिक नगर ते वाशी रेल्वेस्थानक बससेवा सुरू, जितेंद्र आव्हाडांचा बससेवेला हिरवा...

टीएमटीची पारसिक नगर ते वाशी रेल्वेस्थानक बससेवा सुरू, जितेंद्र आव्हाडांचा बससेवेला हिरवा झेंडा

Subscribe
ठाणे शहरातून वाशी रेल्वे स्थानकात जाणारी टीएमटीची पहिलीच बससेवा गुरूवारपासून सुरू करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी या बससेवेला हिरवा झेंडा दाखविला.
पारसिक नगर, खारीगाव, कळवा येथून वाशी येथे रोजगारासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. वाशी येथे विविध आस्थापनांची कार्यालये असल्याने नोकरदारवर्गाला आपले नोकरीचे ठिकाण गाठण्यासाठी कळव्याहून ठाणे स्टेशन गाठून वाशीला जावे लागत होते. हा द्रविडी प्राणायाम टाळण्यासाठी ठाणे परिवहन समिती सदस्य प्रकाश पाटील यांना ठाणे ते वाशी ही बससेवा सुरू करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्याच्या सूचना डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केल्या. त्यानुसार प्रकाश पाटील यांच्यासह अभिजीत पवार यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही बससेवा सुरू केली.

पारसिक नगर येथून बरेच तरूण तरुणी रोज वाशी येथे प्रवास करीत असतात; त्या सर्वांना या बससेवेचा फायदा होईल, अशी आशा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. आज या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिवहन सभापती विलास जोशी,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे,  मा. विरोधीपक्ष नेते मिलींद पाटील, परिवहन सदस्य प्रकाश पाटील माजी नगरसेविका सुरेखा पाटील, अभिजीत पवार अर्जुन पाटील, अरविंद मोरे , परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे वाहतूक अधीक्षक सचिन दिवेडकर सागर  डोनाकोंडा समीर भगत चेतन शेलार दिनेश बने व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


हेही वाचा : पेंग्विन सेनेने आता ‘कबर बचाव अभियान’ सुरू करावं, आशिष शेलारांची मविआवर टीका


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -