घरमहाराष्ट्रपुण्यातील भामा आसखेड प्रकल्पासाठी सभागृहात गदारोळ

पुण्यातील भामा आसखेड प्रकल्पासाठी सभागृहात गदारोळ

Subscribe

रखडलेला भामा आसखेड पाणी प्रकल्पावरून सर्व पक्षीय नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी आणि काम पुर्ण करण्याची जोरदार मागणी केली.

रखडलेला भामा आसखेड पाणी प्रकल्पावरून सर्व पक्षीय नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी आणि काम पुर्ण करण्याची जोरदार मागणी केली. शहराच्या पूर्व भागाकरीता भामा आसखेड प्रकल्प आखण्यात आला. भामा आसखेड धरणातून जल वाहिनीतून पाणी आणले जाणार आहे. साधारणपणे चार टिएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प रखडला असल्याने पूर्व भागात अपुरा पाणी पुरवठा होत आहे. याप्रश्नी नगरसेवकांनी सभागृहात गदारोळ घातला. नगरसेवक अनिल टिंगरे, योगेश मुळीक, महेंद्र पठारे, अविनाश साळवे, नाना भानगिरे, गणेश ढोरे, आदित्य माळवे आदींनी प्रकल्पासंदर्भात प्रश्न उपस्थित केले.

याविषयावर पाणी पुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी खुलासा करताना योजनेतील साडे तीन किलोमीटर लांबीच्या जलवाहिनी टाकण्याचे काम प्रकल्प बाधित शेतकर्यांनी विरोध करुन अडविल्याचे नमूद केले. पोलीस बंदोबस्त मागवून हे काम पूर्ण करून मार्च महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल असे नमूद केले. समाविष्ट गावातील पाणी पुरवठा योजना स्वतंत्र पणे राबविले जाईल. हा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त केला जाईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा –

काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकमत आता शिवसेनेशी बोलू – पृथ्वीराज चव्हाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -