घरमहाराष्ट्रबावनकुळे भाजपाची सी टीम; केसीआर यांची वकिली केल्याबद्दल संजय राऊतांनी साधला निशाणा

बावनकुळे भाजपाची सी टीम; केसीआर यांची वकिली केल्याबद्दल संजय राऊतांनी साधला निशाणा

Subscribe

मुंबई : संजय राऊतांनी (Sanjay Raut) केसीआर (KCR) यांना भाजपाची बी टीम म्हटल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केसीआर यांची बाजू घेत महाविकास आघाडीला त्यांची भीती वाटत असल्यामुळे ते असा आरपो करत असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी आता बावनकुळेंवर निशाणा साधला आहे. बावनकुळे भाजपाची सी टीम आहे आणि त्यांच्या हातात काहीच नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. (C Team of Bawankule BJP After advocating for KCR Sanjay Raut hit the mark)

हेही वाचा – आमच्या राज्यातील हस्तक्षेप ठरेल; केसीआर यांच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वक्तव्यावर राऊतांचा टोला

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांना महत्त्व देण्याची गरज नाही, असे मी आधीही म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे स्वत: भारतीय जनता पक्षाची सी टीम आहेत. त्यांच्या हातात काहीच नाही. सर्व काही दिल्लीतून ठरवले जाते. आता महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाची कमान ना देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, ना बावनकुळेंच्या हातात आहे. सर्व काही दिल्लीच्या आदेशाने चालते. परंतु बावनकुळे यांनी केसीआर यांची वकिली कधीपासून सुरू केली? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊत म्हणाले की, मी एवढेच म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात निवडणूक जिंकण्यासाठी बी टीम, सी टीम बनवली आहे, आता नवीन टीम तयार झाली आहे. 2019 मध्ये एमआयएमची बी टीम बनवली होती. कधी ते मनसेची बी टीम बनवतात आणि त्यांचं काम झालं की विसरतात. आता या लोकांनी केसीआरला बोलावले आहे. पण महाविकास आघाडी प्रत्येक प्रकारची लढाई लढण्यास सक्षम आहे. आम्ही प्रत्येक लढाई लढू आणि जिंकू.

- Advertisement -

हेही वाचा – BRS बद्दल विरोधकांची भूमिका काय?, खर्गेंनी दिली माहिती

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं हित पाहण्यासाठी इतर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी येण्याची गरज नाही

केसीआर यांनी तेलंगणा राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित जरूर पाहावं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं हित पाहण्यासाठी इतर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी इथे येण्याची गरज नाही. हा आमच्या राज्यातील हस्तक्षेप ठरेल. तुमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर काम करत नाही. तुमचा पक्षाकडे राजकीय धोरण नाही. आपण तेलंगणामधले पक्ष आहात, तुमचा पक्ष बाजूच्या आंध्रप्रदेशमध्येही नाही, पण तुम्ही महाराष्ट्रात घुसत आहात याचं कारण भारतीय जनता पक्षाने तुम्हाला सुपारी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला त्रास द्यायचा, मतविभागणी करायची आणि त्यासाठी केसीआर यांचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे भारतीय जनता पक्षाकडून. 2019 त्याआधी आणि नंतर एमआयएमला याचपद्धतीने आणलं होतं. भारतीय जनता पक्षाचा बी टीम तयार करण्याचं एक स्वतंत्र कक्ष आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपावर केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -