घरCORONA UPDATEमविआ सरकारच्या ६ व्या मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मविआ सरकारच्या ६ व्या मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Subscribe

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोरोनाविरोधातील लढाई लढत असताना सरकारमधील मंत्री आणि आमदारांना देखील कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे. आतापर्यंत पाच मंत्र्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. या यादीत आता राज्याते दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख आणि आता सुनील केदार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुनील केदार यांना गुरुवारी ताप आला आणि त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. दुपारी त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन अँटीजेन चाचणी केली. त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर लगेचच तिथेच ते उपचारासाठी दाखल झाले.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -