Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE नागपूरमध्ये तिसऱ्या लाटेच्या निर्बंधांबाबत दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दुमत !

नागपूरमध्ये तिसऱ्या लाटेच्या निर्बंधांबाबत दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दुमत !

Related Story

- Advertisement -

नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर ४ ते ५ इतका होता मात्र आता हा आकडा १० वर पोहचला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्य़ा मोठ्याप्रमाणात वाढतेय असे म्हणता येणार नाही. मात्र कोरोनाचा धोका अद्याप टळलेला देखील नाही. याचपार्श्वभूमीवर नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी येत्या तीन दिवसांत नागपूरमध्ये लॉकडाऊन नाही तरी निर्बंध लावण्यात येतील असा निर्णय जाहीर केला. मात्र या निर्णयावर नागपूरवासियांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

अशातच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत नागपूरवासियांना मोठा दिलासा दिला आहे. वड्डेटीवार म्हणाले की, “निर्बंध लागले तर संपूर्ण राज्यात लागतील एकट्या नागपूरसाठी लॉकडाऊन नाही.” त्यामुळे नागपूरमध्ये तिसऱ्या लाटेच्या निर्बंधांबाबत दोन कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दुमत असल्याचे पाहायला मिळत आहे.  पालकमंत्री नितीन राऊत यांनी काल नागपूरमध्ये लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय जाहीर करताच आज मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नागपूरकारांना मोठा दिलासा मिळत आहे.

- Advertisement -

यापूर्वीच्या लॉकाडाऊनचा फटका नागपूरातील व्यापारी वर्गालाही मोठ्या प्रमाणात बसला. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागल्यास व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होईल. त्यामुळे नितीत राऊत यांच्या निर्णयाचा व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागपूरवासियांकडून जोरदार विरोध करण्यात येतोय.

मात्र विजय वड्डेटीवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, यासंबंधीत निर्णय मुख्यमंत्री घेणार, मात्र पुणेसाठी एक वेगळा नियम, नागपूरसाठी वेगळा नियम असं होणार नाही. जे काही निर्बंध लागतील ते संपूर्ण राज्यासाठी लागतील, परंतु राज्यात पुन्हा एका लॉकडाऊनची कुठलीही चर्चा नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागपूरवासियांना सध्या तरी लॉकडाऊनमधून दिलासा मिळत आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -