Friday, July 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नंदूरबारमध्ये गाडी दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

नंदूरबारमध्ये गाडी दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू

तोरणमाळ खोर्‍याचा अतिदुर्गम भाग असणार्‍या सिंदीदिगर घाटातील दुर्घटना

Related Story

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ खोर्‍याचा अतिदुर्गम भाग असणार्‍या सिंदीदिगर घाटात प्रवासी वाहतूक करणारी एक क्रुझर गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या गाडीत 30 जण प्रवास करत होते. जवळपास पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहीत समजत आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

प्रवासी वाहतूक करणारी खाजगी क्रुजर गाडी सिंदी दिगर घाटात खोल दरीत कोसळली. सायंकाळीच्या सुमारास ही क्रुझर गाडी या घाटातून प्रवाशांना घेवून जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पूर्ण चुराडा झाला आहे. या गाडीत असलेल्यांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. गाडी दरीत कोसळली तेव्हा काही जणांनी जीव वाचवण्यासाठी गाडीतून बाहेर टाकल्यात. त्यामुळे जबर मार लागून अनेक काही जखमी झाले आहे तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. दरीत ज्या ठिकाणाहून गाडी खाली कोसळली त्या वाटेत ठिकठिकाणी प्रवाशांचे मृतदेह पडून होते.

- Advertisement -

या गाडीत 30 प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रुझर गाडी दरीत कोसळल्याने बचाव आणि मदत कार्याला मोठा अडथळा येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्यासाठी धाव घेतली आहे.

- Advertisement -