घरमहाराष्ट्रआमदार कुडाळकरांच्या कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी 23 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

आमदार कुडाळकरांच्या कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी 23 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

Subscribe

आमदार कुडाळकरांच्या कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी 23 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. आमदार मंगेश कुडाळकर शिंदे गटात सामील झाल्यानंतर ही तोडफोड झाली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात मोठे बंड केले. यानंतर शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर शिंदे गटात सामील झाले. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी कुर्ला परिसरातील आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणात आमदार कुडाळकर यांनी केलेल्या तक्रारीवरुन कुर्ला पोलिसांनी शिवसैनिकांवर कारवाई सुरू केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटात कुडाळकर गेल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी कुडाळकर यांच्या कुर्ला येथील कार्यालयावर हल्ला केला. शिवसैनिकांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयाबाहेरील बॅनर्सची तोडफोड केली होती. मंगेश कुडाळकर यांनी आपल्या नावाच्या फलकाची मोडतोड करणाऱ्याविरोधात पोलिसाकडे तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी २३ शिवसैनिकांविरोधात नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

काय घडले होते –

शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असा संघर्ष टोकाला पोहचला होता. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 42 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर कुर्ला येथील शिवसेनेचे  आमदार मंगेश कुडाळकर एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. त्यानंतर शिवसैनिकांनी रोष व्यक्त करत मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. तसेच कार्यालयाची तोडफोड केली होती.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -