घरमुंबईधारावीत सिलेंडरचा स्फोट, १७ जखमी; ५ गंभीर १२ जणांची प्रकृती स्थिर

धारावीत सिलेंडरचा स्फोट, १७ जखमी; ५ गंभीर १२ जणांची प्रकृती स्थिर

Subscribe

मुंबईतील आशियामधील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणारी धारावी येथे रविवारी एक धक्कादायक घटना घडली. धारावी परिसरात सिलेंडरच्या स्फोटात १७ जण जखमी झाले आहेत. जखमींना मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सायन रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. १७ पैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. यापैकी दोघांना ५०-६० टक्के भाजले आहे. ही घटना आज रविवारी शाहू नगर, धारावी येथे दुपारी साडेबारा वाजता घडली असून अद्याप बचाव कार्य सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

अशी घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, धारावीच्या शाहू नगरातील कमला नगरमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.धारावीच्या मुबारक हॉटेलच्या बाजूलाच कमला नगर आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन फायर इंजिनच्या मदतीने ही आग विझवली. त्यानंतर या आगीत होरपळलेल्या लोकांना तात्काळ बाहेर काढून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत एकूण १७ जणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी १० जण किरकोळ भाजले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यापैकी दोघे ५० ते ६० टक्के भाजल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे तर दोघांचा चेहरा भाजला असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टर डॉ. सायली यांनी सांगितले.

- Advertisement -

जखमींची नावे

1) राजेशकुमार जैस्वाल (४५)
2) अबिना बीबी शेख (२७)
3) गुलफान अली (२९)
4) अलिना अन्सारी (५)
5) मोह. अब्दुल्ला (२१)
6) अस्माबानो (१८)
7) फिरोज अहमद (३५)
8) फैयाज अन्सारी (१६)
9) प्रमोद यादव (३७)
10) अत्ताझम अन्सारी (४)

प्रकृती गंभीर असणाऱ्यांची नावे

11) सातारादेवी जैस्वाल (४०) ५० ते ६० टक्के भाजले, प्रकृती गंभीर.
12) शौकत अली (५८) ५० ते ६० टक्के भाजले, प्रकृती गंभीर.
13) सोनू जैस्वाल (८) चेहरा भाजला, प्रकृती गंभीर.
14) अंजू गौतम (२८) चेहरा भाजला, प्रकृती गंभीर.
15) प्रेम जैस्वाल (३२) चेहरा भाजला, प्रकृती गंभीर.
16)सबिना फिरोज अहमद (३२)
17)मेहरूंनिसा अबीद खान (४०)

- Advertisement -

गॅस सिलेंडरचा स्फोट होताच नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. या घरातील आणि आजूबाजूच्या घरातील १५ जण या आगीत होरपळले गेले. त्यामुळे स्थानिकांचा आक्रोश सुरू झाला. तसेच आग विझवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाली. यावेळी काही लोकांनी आगीवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -