घरदेश-विदेशझपाट्याने वाढताहेत कोरोना रुग्ण महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारला चिंता!

झपाट्याने वाढताहेत कोरोना रुग्ण महाराष्ट्राबद्दल केंद्र सरकारला चिंता!

Subscribe

देशात एकीकडे कोरोनावरील लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. खासकरून महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. तसेच कोरोना संसर्गाला सहजतेने घेऊ नका, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण अतिशय झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकार अतिशय चिंतेत आहे. देशाला कोरोनामुक्त करायचे असेल तर सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल म्हणाले.

एका पत्रकार परिषदेत व्ही. के. पॉल यांनी देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीसंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्राबाबत आम्ही फार चिंतेत आहोत. महाराष्ट्रात वाढत असलेला प्रादुर्भाव हा गंभीर प्रश्न आहे. कोरोना संसर्ग सहजतेने घेऊ नका. तसेच कोरोनामुक्त व्हायचे असेल तर कोरोनासंबंधी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावेच लागेल, असे व्ही. के. पॉल म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रातील स्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे हा संसर्ग वाढत असल्याचे कुठेही आढळून आलेले नाही. हा प्रादुर्भाव चाचण्यांमध्ये आलेली कमी, बाधित रुग्णांच्या संपर्कात येणार्‍यांचा आणि त्यांचा शोध घेण्यात येणार्‍या उणीवामुळे कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे, असे आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले.

देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १ लाखाच्यावर गेली आहे. मध्य प्रदेश, हरयाणा आणि गुजरातमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. आम्ही या राज्यांसोबत बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे. या सर्व राज्यांनी आता कंबर कसून मैदानात उतरावे, असे आम्ही सांगितले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

- Advertisement -

महाराष्ट्रात कोरोनाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रादुर्भावामुळे सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. यानुसार नागपुरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. भाजीपाला, फळ दुकाने, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र सुरूच राहतील. यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक भागांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -