घरदेश-विदेशनवाब मलिकांविरोधात गुन्हा दाखल करा,केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे आदेश

नवाब मलिकांविरोधात गुन्हा दाखल करा,केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाचे आदेश

Subscribe

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात दिल्लीतील केंद्रीय अनुसूचित जाती आयोगात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणावर झालेल्या सुनावणीत आयोगाने नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याकडून खोट्या जात प्रमाणपत्राबाबतच्या आरोपाविरोधात आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. नवाब मलिक यांनी आरोप केला होता की, समीर वानखेडे यांनी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र दाखल करत नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. वानखेडे हे मुस्लीम असतानाही त्यांनी अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचेही नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्यानंतर मलिक यांच्याकडून छळ होत असून आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात येत असल्याची तक्रार वानखेडे यांच्याकडून केंद्रीय अनुसूचित जाती आयोगात करण्यात आली होती.

- Advertisement -

या आरोपांची दखल घेत दिल्ली राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, त्यांच्यावतीने अ‍ॅडिशनल कमिशनर प्रवीण पडवळ यांनी आयोगासमोर उपस्थित राहून आयोगाला माहिती दिली. यावेळी आयोगाने मंत्री नवाब मलिक यांच्यावर 7 दिवसात गुन्हा दाखल करून केलेल्या कारवाईची माहिती राष्ट्रीय अनुसूचित आयोगाला देण्यात यावी, असे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

त्याचबरोबर राज्य अनुसूचित जाती पडताळणी समितीकडून करण्यात येणार्‍या तपासाचा रिपोर्ट एका महिन्यात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला सोपवण्याचे निर्देशही आयोगाने दिले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी 7 मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -