Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र हसन मुश्रीफांच्या धमक्यांना मी घाबरत नाही - चंद्रकांत पाटील

हसन मुश्रीफांच्या धमक्यांना मी घाबरत नाही – चंद्रकांत पाटील

Related Story

- Advertisement -

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या विरोधात रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं. यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफांच्या धमक्यांना मी घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. तक्रार दाखल करायची असेल तर बिनधास्त करा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याचे आरोप केले. यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगत चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात देखील रस्ते घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं. यावर उत्तर देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांच्या धमक्यांना घाबरत नाही असं म्हणत तक्रार करायची असेल तर खुशाल करा, असं खुलं आव्हान दिलं.

- Advertisement -

“माझं नाव घेतल्याशिवाय मुश्रीफ यांना झोप लागत नाही. माझे चांगले मित्र असल्यामुळे माझं नाव घेऊन जर चांगली झोप येत असेल तर हरकत नाही. १००-२०० कोटी अब्रुनकसानीचा दावा ते नेहमी करतात. दावा दाखल करताना स्टॅम्प ड्युटीसाठी व्हाईट मनी लागतो तो आहे का?” असा खोचक टोला देखील लगावला.

“हॅम प्रकल्पांतर्गत राज्यात रस्ते बनत आहेत आणि त्यांची उद्घाटनं हे करत फिरत आहेत. तो एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्रात आणला. मी बांधकाम मंत्री झालो तेव्हा ९०० कोटींचं बजेट होतं. पाच वर्ष कार्यकाळ संपेपर्यंत मी ९००० कोटींचं केलं. यासाठी मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ३० हजार कोटींचा प्रकल्प मागितला. त्यांनी अव्यवहार्य असल्याचं म्हटलं, तेव्हा मी व्यवहार्य करुन दाखवतो असं त्यांना सांगितलं. त्यावेळी मला नितीन गडकरी असं म्हणाले की ६० टक्के आधी निधी त्यानंतर ४० टक्के १० वर्षांनी निधी मिळेल. मात्रा, याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मी जागतिक स्तरावार बैठका केल्या. त्यानंतर याला जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला. १३७ पॅकेजस् चे वर्क ऑर्डर निघाल्या आणि कामं देखील पूर्ण झालं. आता जर त्या हॅममध्ये घोटाळा आहे असं हसन मुश्रीफांना वाटत असेल तर १९ महिने झोपा काढत होता का? १९ महिन्यांनी साक्षातकार झाला का?” असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला.


- Advertisement -

हेही वाचा – रस्ते घोटाळ्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात ACB कडे तक्रार करणार – हसन मुश्रीफ


 

- Advertisement -