Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा US Open : डॅनिल मेदवेदेवच्या विजयाने जोकोव्हिचचा स्वप्नभंग

US Open : डॅनिल मेदवेदेवच्या विजयाने जोकोव्हिचचा स्वप्नभंग

Related Story

- Advertisement -

डॅनिल मेदवेदेवने जगातील नंबर एक खेळाडू असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचचे २१ वे ग्रॅंडस्लॅम मिळवण्याचे स्वप्न अखेर पुर्ण होऊ दिले नाही. अमेरिकन खुल्या टेनिस पुरूष एकेरी स्पर्धेत नोव्हाकला डॅनिल मेदवेदेवकडून पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या वर्षात तीन मोठ्या स्पर्धा जिंकत जोकोव्हिचने एक वेगळा विक्रम निर्माण केला होता. पण त्याच्या आजच्या पराभवामुळे एका विक्रमापासून वंचित राहण्याची वेळ जोकोव्हिचवर आली आहे. याआधी ऑस्ट्रेलिय, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन अशा तिन्ही ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा मान त्याने मिळवला होता. आजच्या विजयानंतर २१ वे ग्रॅंडस्लॅम जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला असता.

टेनिसमध्ये राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्या नावावर २० ग्रॅंडस्लॅम किताब जिंकण्याचा मान आहे. त्यामुळे आजच्या स्पर्धेच्या विजयाने एक नव्या विक्रमाच्या दिशेने जोकोव्हिच आगेकूच करेल असा सगळ्या टेनिस रसिकांचा अंदाज होता. पण डॅनिल मेदवेदेवने मात्र त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. मेदवेदेवने अतिशय सुंदर असा खेळ करत अगदी सरळ सेटमध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला. जोकोव्हिचला तीन सरळ सेटमध्ये पराभव स्विकारावा लागला खरा. पण हा पराभव मात्र सोपा नव्हता. अतिशय चिवट अशी झुंज देत जोकोव्हिचनेही चांगला प्रयत्न केला होता. तब्बल २ तास १६ मिनिटे इतका वेळ संपुर्ण सामना चालला. अतिशय चुरशीच्या अशा सामन्यात डॅनिलने चांगला खेळ करत जोकोव्हिचला ६-४, ६-४, ६-४ अशा तीन सेटमध्ये पराभूत केले.

- Advertisement -

आजच्या स्पर्धेतील विजयानंतर जोकोव्हिचला ५२ वर्षांपूर्वीचा रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी होती. याआधी ५२ वर्षापूर्वी म्हणजे १९६९ मध्ये रॉड लेव्हरने ही कामगिरी केली होती. त्यामुळेच अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकण्यासोबतच एकाच वर्षात इतक्या स्पर्धा जिंकण्याचा नवा विक्रम हा जोकोव्हिचच्या नावे झाला असता. यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन अशा तिन्ही स्पर्धांमधील जेतेपद हे जोकोव्हिचचने नावावर केले होते.


हेही वाचा –  Ind Vs Eng 5th Test 2021 : म्हणूनच पाचवी टेस्ट रद्द, दादा म्हणाला… 


- Advertisement -

 

- Advertisement -