घरमहाराष्ट्रवाद विकोपाला! शिवरायांनंतर आता फुले, आंबेडकर, कर्मवीरांवर टीका; आव्हाडांचा भाजपावर संताप

वाद विकोपाला! शिवरायांनंतर आता फुले, आंबेडकर, कर्मवीरांवर टीका; आव्हाडांचा भाजपावर संताप

Subscribe

भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी देखील यावर तीव्र आक्षेप नोंदवला. हा वाद थांबत नाही तोवर आता राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आता नव्या वादाला तोंड फोडले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे, यामुळे त्यांच्यावर आता टीकेची झोड उठवली जात आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड भाजपवर चांगलेच संतापले आहेत.

- Advertisement -

आव्हाडांनी ट्विट करत संपात व्यक्त केला आहे. आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपा नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झाल्याचं वाटत आहे. एकापाठोपाठ एक महापुरुषांची बदनामी करणारी व्यक्तव्य येत आहेत. अगोदर छत्रपती शिवाजी महाराज, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भाऊराव पाटील. चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध..!

- Advertisement -

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

पैठणमधील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हतं. तरीसुद्धा महापुरुषांनी शाळा उघडल्या. आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारने त्यांना अनुदान दिलं नाही, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं झोळीप्रमाणे पुढे पसरून दाखवलं.

यावर पाटील पुढे म्हणाले, ते म्हणायचे मला पैसे द्या, त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून 2 टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे.

दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय स्तरातून टीका सुरु झाली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह काँग्रेसनेही सकडून टीका केली आहे. यासोबत सोशल मीडियावरही चंद्रकांत पाटलांना ट्रोल करत संताप व्यक्त केला जात आहे.


मुंबईत आज महारोजगार मेळावा, तरुणांना ८ हजार ६०८ जागांवर नोकरीची संधी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -