Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी वरिष्ठांनी आदेश दिल्यास वाघाशी दोस्ती करण्यास तयार, मोदी-ठाकरेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

वरिष्ठांनी आदेश दिल्यास वाघाशी दोस्ती करण्यास तयार, मोदी-ठाकरेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

राज्य सरकारने ३ हजार कोटी मराठ्यांसाठी पॅकेज म्हणून द्यावेत - चंद्रकांत पाटील

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. राज्यातील प्रश्नांवर १ तास चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींसोबत वैयक्तिक भेट घेतली आहे. या भेटीवर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री आणि मोदींची भेट झाली ही चांगली गोष्ट आहे. मोदींशी ठाकरेंचं चांगल जमतंय आमच्याशी का जमत नाही माहिती नाही परंतु वरिष्ठांचा आदेश असेल तर वाघाशी पुन्हा दोस्ती करु अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अर्धा तास वैयक्तिक भेट झाली होती. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान या भेटीवर वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. याचे स्वागत आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते ही चांगली गोष्ट आहे. असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच वैयक्तिक भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, दोन मोठ्या माणसाच्या भेटीमध्ये काय घडलंय हे सांगता येणार नाही. आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती परंतु त्यांची जुनी मैत्री मोदींसोबत आहे. देवेंद्र फडणवीस आणि पाटलांसोबत त्यांचे पटत नाही. ठाकरेंची आमच्याशी मैत्री असतो तर १८ महिन्यांपुर्वी आमचे सरकार आले असते अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे मराठा आरक्षणाची केलेली मागणी दिशाभूल करणारी आहे. मराठा आरक्षणाचा केंद्र आणि मोदीचा मुद्दा नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर केंद्र सरकारने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा सर्व अधिकार राज्य सरकारकडे आहे. मराठा समाजाला मागास असल्याचे राज्य सरकारला दाखवावे लागणार आहे. राज्य सरकारने मागासवर्ग आयोग नेमून मराठा समाजाला आरक्षण द्यावं लागेल यासाठी मेहनतही घ्यावी लागणार आहे. केवळ केंद्र सरकारकडे जाऊन दिशाभूल करु नये अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच मोदींनी मोफत लसीकरण करण्याची घोषणा केल्यामुळे लस खरेदीसाठीचे ६ हजार कोटी वाचणार आहेत. यातून राज्य सरकारने ३ हजार कोटी मराठ्यांसाठी पॅकेज म्हणून द्यावेत अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -