घरताज्या घडामोडी१५ मे पर्यंत 'घर चलो अभियान' राबवणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

१५ मे पर्यंत ‘घर चलो अभियान’ राबवणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

Subscribe

भारतीय जनता पक्षाच्या वतीने घर चलो अभियानाला आम्ही सुरूवात करतोय. या घर चलो अभियानाच्या माध्यमातून ७ लक्ष घरी भारतीय जनता पक्षाची संघटना ही सरल अॅपच्या माध्यमातून ७८२००७८२०० या क्रमांकावर जाऊन नोंदणी करणार आहे. तसेच १५ मे पर्यंत हे अभियान आम्ही पूर्ण करणार आहोत. याकरिता संघटनात्मक बैठक पुणे शहराची झाली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पुण्यात आज भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत घर चलो अभियानाबाबत मोठं वक्तव्य केलं. आमचा महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात बूथ सशक्त अभियान हा कार्यक्रम सुरू आहे. ७ लक्ष परिवारामध्ये भाजपा हार्ट टू हार्ट आणि मॅन टू मॅन सरल अॅपला जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि केंद्रीय भाजप कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारने ९ वर्षात जे या देशाकरिता उपक्रम राबविले आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनांवर काम केलं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

- Advertisement -

पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता बावनकुळे म्हणाले की, याची तयारी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. काल नागपूरमध्ये बैठक झाली. मी महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये बूथ सशक्तिकरण अभियान आहे. ३ कोटी घरापर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. ३ कोटी मतदारांना आम्ही थेट मोदींच्या योजनांशी जोडणार आहोत, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


हेही वाचा : शरद पवारांच्या भेटीसाठी उदय सामंत ‘सिल्व्हर ओक’वर, नेमकं काय चाललंय?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -