घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रफोटो व्हायरलची धमकी देत तरुणीवर बलात्कार

फोटो व्हायरलची धमकी देत तरुणीवर बलात्कार

Subscribe

नाशिक : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका तरुणाने तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित रोहित मधुकर शिंदे (वय २१, रा. शिंदे वस्ती, गंगापूर कॅनॉल, माडसांगवी, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार, पीडित तरुणी व संशयित रोहित एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रोहितने तरुणीशी ओळख वाढवली. त्यातून दोघांमध्ये मैत्री झाली. ही संधी साधत रोहितने तिचे अश्लिल फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले. त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जानेवारी ते एप्रिल २०२३ या कालावधीत स्वत:च्या घरी, मुलीच्या घरी व पंचवटीतील एका लॉजवर तिच्यावर बलात्कार केला. त्याचा त्रास असहाय्य झाल्याने तिने आपबिती कुटुंबियांनी सांगितली. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात रोहितविरूद्ध फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.

- Advertisement -
घटनांमध्ये वाढ 

नवीन काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आल्यामुळे एका क्लिक वर फोटो काढले सहज सोप्पे झाले आहे. मात्र, या सुविधेचा काही अप्रवृत्ती चुकीचा वापर करताना दिसून येतात. नव्या तरुण पिढीत प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा नवीन ट्रेंड आला आहे. या ट्रेंडच्या नादात अनावधानाने आपले खाजगी क्षणही कॅमेऱ्यात कैद केले जातात. मात्र, खाजगी फोटो आणि व्हिडिओ चुकीच्या लोकांच्या हाती लागल्यावर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे काळजी घेणे महत्वाचे ठरते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -