घरताज्या घडामोडीसत्ता मिळविण्यासाठी ईडीचा दुरूपयोग : छगन भुजबळ

सत्ता मिळविण्यासाठी ईडीचा दुरूपयोग : छगन भुजबळ

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही ईडीने समन्स बजावला आहे याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीचे नाव घेतलं कि लोक घाबरतात, तुमचा छगन भुजबळ करू म्हणून सांगतात. ईडीला त्या लोकांकडून उत्तर दिलं जाईल असे त्यांनी सांगितले.

भुजबळ आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीतील मंत्र्यांविरोधात तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशीचा फास आवळला जात आहे. याबाबत बोलतांना भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला. जलबिन मछली तसे सत्तेशिवाय भाजप राहू शकत नाही. कोणत्याही प्रकारे सत्ता मिळवायची याकरीता कुणावर तरी आरोप, कुणाला तरी नोटीस असं संगळ चाललयं. सत्ता मिळविण्यासाठी ईडीचा दुरूपयोग केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ईडीच्या नावाने लोक घाबरतात. ईडीच्या नावाने तुमचा भुजबळ करू असे सांगितले जाते. शहरातील स्मार्ट सिटीच्या कामाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्या विषयात अजून लक्ष घातलेले नाही. मात्र, एकदा पाहायला गेलो होतो. मात्र, स्मार्ट सिटी योजनेमध्ये नाशिकमध्ये जेवढे काम व्हायला पाहिजे होते तितके काम झालेले नाही, असे भुजबळ म्हणाले. नाशिक शहरातील महापालिकेच्या स्मार्ट बससेवेला विरोध होता आणि आहे. जगातील कुठलीही बससेवा फायद्यात नाही. मुंबईची बेस्ट सेवा त्याला अपवाद आहे. कारण, बेस्टला वीज पुरवठ्यातून होणारा फायदा बससेवेत घातला जात होता. मात्र, इतर कुठेही बससेवा फायद्यात नाही, नाशिक महापालिकेला हा खर्च परवडणार आहे का हे पाहावे लागेल, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -