घरमहाराष्ट्रनाशिकChhagan Bhujbal : राज्यभरात माफी मागत फिरणार का?, शरद पवारांच्या 'त्या' कृतीवर...

Chhagan Bhujbal : राज्यभरात माफी मागत फिरणार का?, शरद पवारांच्या ‘त्या’ कृतीवर भुजबळांचे प्रत्युत्तर

Subscribe

Chhagan Bhujbal : अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) 8 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnvis Government) मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडले आहेत. यानंतर शरद पवार यांनी पक्ष बांधणीसाठी येवल्यातून महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केली. यावेळी त्यांनी भुजबळांचे नाव न घेता म्हटले की, माझा अंदाज चुकला म्हणून मी माफी मागायला आलो आहे. नाशिकमध्ये अनेकजणांनी साथ दिली परंतु कोणी सोडून गेले नाही. मात्र माझा अंदाज एकवेळला चुकला असे शरद म्हणाले होते. यानंतर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यभरात माफी मागत फिरणार का? असा प्रश्न उपस्थित करत भुजबळ यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. (Chhagan Bhujbal Will he go around the state apologizing Bhujbals response to Sharad Pawars that act)

छगन भुजबळ म्हणाले की, माणिकराव शिंदे यांनी काल शरद पवार यांच्या सभेचे नियोजन केले होते. परंतु त्यांच्यावर 2020 साली शिस्तभंग कारवाई करत हकालपट्टी करण्यात आली होती. असे असतानाही त्यांनी तारीख घेतली आणि पवारांना येवल्यात येण्याचे आमंत्रण दिले. काल मी येवल्यात गेलो तेव्हा बहुतांश तरुण माझ्या स्वागताला होते; मात्र जे थकलेले वृद्ध जे काही काम करत नाही, ते शरद पवारांच्या सभेला उपस्थित होते, असा टोलाही भुजबळ यांनी शरद पवारांना लगावला.

- Advertisement -

शिवसेनेमध्ये मला मोठं स्थान होतं

भुजबळ म्हणाले की, 2004 ला शरद पवार यांनी मला सांगितलं की, तुम्हाला निवडणुकीला उभं राहावं लागेल. परंतु त्याच्या आधी मी मुंबई शहरातून दोन वेळा आमदार म्हणून माझगावमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलो होतो.
शिवसेनेचा आमदार आणि नेता 1985 सालामध्ये मी झालो. मी अचानक काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर नेता झालो आणि मोठा झालो असं नाही. शिवसेनेमध्ये त्यावेळी जे नेते त्यांच्यासोबत मला मोठं स्थान होतं.

कारण नसताना मला गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला

2003 मध्ये तेलगी घोटाळा झाला. त्या घोटाळ्यातील व्यक्तीला मीच पकडलं. त्यावेळी मी गृहमंत्री असताना घोटाळ्यातील व्यक्तीला मोका लावला. कारण 16 वेळा या व्यक्तीवर कारवाई झाली होती. पण नेहमीप्रमाणे माझ्यावर काहीतरी बालंट आलं. पण जेव्हा कळलं हे काहीतरी विचित्र चाललेलं आहे आणि साहेबांनी मला राजीनामा द्यायला सांगितलं. म्हणून मी राजीनामा दिला. त्यावेळी तेलगी घोटाळा देशभरात झाला होता, म्हणून सुप्रीम कोर्टाने ही केस सीबीआयकडे सोपवली. त्यामुळे सीबीआयने या केससंदर्भात एक दिवस मला बोलावंल. एक-दोन दिवस माझ्या भावालाही बोलावलं. चौकशी पूर्ण झाली. त्यावेळेला भाजपाचं सरकार दिल्लीमध्ये होतं. सीबीआयच्या चौकशी नंतर जी चार्टशीट दाखल करण्यात आली त्यामध्ये भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं. त्यामुळे मला कारण नसताना राजीनामा द्यावा लागला, अशी खंत भुजबल यांनी यावेळी बोलून दाखवली.

पन्नास ठिकाणी तुम्ही माफी मागत फिरणार का?

माझा अंदाज चुकला म्हणून मी माफी मागायला आलो आहे, असे म्हणत काल शरद पवार यांनी येवल्यातून महाराष्ट्र दौऱ्यावर सुरूवात केली. याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, जुन्नर, येवला आणि इतर काही ठिकाणी स्थानिकांनी मला उमेदवारीची गळ घातली होती. म्हणून मी पवारांना मला येवल्यात विकासासाठी पाठवा असे सांगितले. त्यामुळे येवल्यात पवारांनी माझी नाही तर मी येवल्याची निवड केली होती. त्यावेळी सुरक्षित मतदारसंघ वगैरे नव्हता, मी काम केलं म्हणून चार वेळेस निवडून आलो. त्यामुळे मी वीस वर्षांपूर्वी अंदाज चुकला असे पवारांनी म्हणणे साफ चुकीचे आहे. बारामतीनंतर खरा विकास येवल्यात झाला आहे. त्यामुळे येवल्यात माफी मागितली आता पन्नास ठिकाणी माफी मागत फिरणार का?, असा प्रश्नही भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -