घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरAurangabad Constituency: पालकमंत्री संदीपान भुमरेंना शिवसेनेकडून उमेदवारी

Aurangabad Constituency: पालकमंत्री संदीपान भुमरेंना शिवसेनेकडून उमेदवारी

Subscribe

लोकसभेसाठी औरंगाबादमधून शिवसेनेचा उमेदवार अखेर जाहीर करण्यात आला आहे. शिवसेनेचे पैठणचे आमदार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेसाठी औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेकडून अखेर जाहीर करण्यात आला आहे. शिवसेनेचे पैठणचे आमदार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता औरंगाबाद मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. (Lok Sabha Election 2024 Guardian Minister Sandipan Bhumare nominated by Shiv Sena from Aurangabad Constituency)

महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे, वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान आणि एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी झाल्यानंतरही महायुतीकडून कोणाला संधी मिळणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर एकनाथ शिंदे यांनी आज या संपूर्ण चर्चेला पूर्णविराम देत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून संदीपान भुमरे यांना मैदानात उतरवले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Pawar VS Pawar : शेवटच्या सभेत डोळ्यांतून अश्रूही येतील; अजितदादांचा शरद पवारांवर निशाणा

- Advertisement -

लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल

2019 च्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजी नगर मतदारसंघातून म्हणजेच तत्कालीन औरंगाबाद मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे इम्तियाज जलील यांनी 3,89,042 मतांनी विजय मिळवला होता. जलील यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. चंद्रकांत खैरे यांना 3,84,550 मते मिळाली होती. खैरे हे विद्यमान खासदार होते आणि त्यांनी सलग चार वेळा ही जागा जिंकली होती. असे असतानाही त्यांना केवळ 4,492 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर जागेवर चौथ्या टप्प्यात म्हणजेच 13 मे रोजी होणाऱ्या मतदानावेळी कोणता उमेदवारी बाजी मारणार हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Lok Sabha : पीयूष गोयल यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन; उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

भाजपाची माघार (BJP retreat)

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर भाजपाने दावा सांगितलेला होता आणि त्यांच्याकडून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू होती. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री अतुल सावे हे भाजपाकडून लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाली होती. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांच्या नावाची घोषणा होऊनही महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होत नसल्याने महायुतीत या जागेवरून तिढा निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र आता भाजपाने माघार घेतली असून शिवसेनेकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -