घरताज्या घडामोडीपरमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई

परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई

Subscribe

परमबीर सिंग नेमके कुठे आहेत याबाबत संभ्रम अधिक वाढला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या संदर्भात राज्य सरकारने अतिशय सावध भूमिका घेतली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागाच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली आहे. दरम्यान अटकेच्या भितीने परमबीर सिंह हे परदेशात पळून गेल्याची चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी लूकआउट नोटीस बजावल्याने ते इतक्या सहजासहजी पळून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे परमबीर सिंग नेमके कुठे आहेत याबाबत संभ्रम अधिक वाढला आहे.

परमबीर सिंग यांच्या रजेचा कालावधी संपला आहे. चांदीवाल आयोगामार्फत त्यांची चौकशी सुरू आहे. सिंग यांनी रजेवर जाताना त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा दिलेले नाही. त्यामुळे त्यांना वैद्यकीय मंडळाच्या समोर उभे राहावे लागू शकते.

- Advertisement -

परमबीर यांचा शोध सुरू आहे. ते परदेशात पळून गेल्याची चर्चा आहे. मात्र ते तितकेसे सोपे नाही. कारण त्यांच्या विरोधात लूकआउट नोटीस बजावण्यात आली आहे.स रकारी अधिकारी असल्याने त्यांना सरकारच्या परवानगी शिवाय परदेशात जाताच येत नाही. आता सरकार त्यांच्या निलंबनासंदर्भात अशितय सावध पावले उचलत आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच याबाबतची कार्यवाही सूरु होऊ शकते असे सष्ट करण्यात आले आहे.

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएमार्फत सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी परमबीर सिंग यांना अनेकदा समन्स बजावण्यात आले आहे. मात्र ते त्यांनी स्वीकारलेले नाही.

- Advertisement -

परमबीर सिंह समन्स देण्यापुर्वीच गायब

गृहविभागातील वरिष्ठ पोलीसअदिकाऱ्यांच्या मते परमबीर सिंह हे त्यांना पहिले समन्स देण्याअगोदरच देशाबाहेर पळाले आहेत. ते चंदीदढमधून नेपाळ आणि नेपाळमार्गे लंडनला पळून गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना पळून जाण्यासाठी सरकारने एक प्रकारे मदत केली काय असे आता बोलले जात आहे.


हेही वाचा : लोकांची दिशाभूल करुन सरकारला बदनाम करण्यात येतंय, जयंत पाटील यांची टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -