घरमहाराष्ट्रमुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार रामलल्लांचे दर्शन!

मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार रामलल्लांचे दर्शन!

Subscribe

शरयू नदीच्या तिरावर आरती होणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी दुपारी ४.३० वाजता अयोध्येत रामलल्लांचे दर्शन घेतील. त्यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि महाराष्ट्रातील कॅबिनेटमधील काही मंत्री असतील. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शरयू नदीच्या तिरावर आरती करणार नाहीत, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले. रामलल्ल्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी अयोध्येत जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मीडियाला सांगितले की, त्यांच्या दौर्‍याला कोणाचाही विरोध नाही आहे. मी सर्वांना भेटलो आहे. देशातील सर्वांनी रामलल्लाचे दर्शन घ्यावे अशी आमची इच्छा आहे. उद्धव ठाकरे हे उद्या प्रथम लखनौला येतील. त्यानंतर लखनौहून रस्ते मार्गाने अयोध्येला येतील.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत आल्यानंतर साडे तीन वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील. त्यानंतर 4.30 वाजता रामलल्लांचे दर्शन घेतील. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, कॅबिनेटमधील काही मंत्री आणि शिवसेनेचे नेते असणार आहेत. तसेच, अयोध्येत शांतता राहावी. मंदिर उभारणीतही शिवसेना सहभागी होऊ इच्छित आहे. त्याबाबत मुख्यमंत्रीच माहिती देतील, असे संजय राऊत म्हणाले.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या शरयू तिरावर आरती करणार नाहीत. शरयू तिरावर आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, गुरुवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली. करोना विषाणूंच्या प्रार्दुभावामुळे गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -