घरताज्या घडामोडी'पेंग्विनला मराठमोळं पेंग्विनकर नाव देऊन प्राणिसंग्रहालयाचा महापौर करु', चित्रा वाघांचा किशोरी पेडणेकरांवर...

‘पेंग्विनला मराठमोळं पेंग्विनकर नाव देऊन प्राणिसंग्रहालयाचा महापौर करु’, चित्रा वाघांचा किशोरी पेडणेकरांवर घणाघात

Subscribe

राणी बागेतील पेंग्विनचे नाव ऑस्कर असे इंग्रजीत ठेवल्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. मराठीला फक्त पाट्यांपुरता भाव, युवराजांच्या पेंग्विनचे इंग्रजीत नाव? असे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे. पेंग्विनचे फोटो शेअर करत चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

भाजप आणि शिवसेनेमधील वाद अधिकच वाढताना दिसत आहे. राणीच्या बागेतील पेंग्विनचे नाव ऑस्कर असे इंग्रजीत ठेवल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर घणाघात केला होता. यानंतर पेडणेकरांनी उत्तर देताना माकडाच्या पिल्लाचे नाव चिवा ठेवू असे संगत भाजपला पुन्हा डिवचलं होते. यावर आता चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा घणाघात केला आहे. राणीच्या बागेतील पेंग्विनला मराठमोळ पेंग्विनकर नाव देऊन प्राणी संग्रहालयाचा महापौर करु असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी किशोरी पेडणेकरांना लगावला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महापौर किशोरी पेडणेकरांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. ऑस्कर नावावरुन मिर्ची झोंबलीये आणि आमच्या लाडक्या किशोरी पेंग्वीनकर ताईंचा चांगलाच भडका उडालाय, पेंग्विनला मराठमोळं ‘पेग्विनकर’ हे नाव कसं वाटतंय? नि त्याला आपण प्राणीसंग्रहालयाचा महापौरही बनवुया असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी ट्विट करत लगावला आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

राणीच्या बागेतील पेंग्विनचे नाव ऑस्कर ठेवल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महापौर किशोरी पेडणेकरांवर टीकास्त्र डागलं होते. राज्य मंत्रिमंडळात दुकानांच्या पाट्या मराठीत असणं बंधनकारक केले आहे. परंतु राणीच्या बागेतील पेंग्विनचे नाव इंग्रजीत ठेवल्यामुळे चित्रा वाघ यांनी ट्विट करत मराठीचा पुळका देखाव्या पुरता असल्याची टीका केली होती. यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं होते. पुढच्या वेळी हत्तीच्या पिल्लाचे नाव चंपा आणि माकडाच्या पिल्लाचे नाव चिवा ठेवू असा खोचक निशाणा पेडणेकरांनी लगावला होता. यानंतर आता चित्रा वाघ यांनी पुन्हा महापौर किशोरी पेडणेकरांवर टोला लगावला आहे.

- Advertisement -

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

राणी बागेतील पेंग्विनचे नाव ऑस्कर असे इंग्रजीत ठेवल्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. मराठीला फक्त पाट्यांपुरता भाव, युवराजांच्या पेंग्विनचे इंग्रजीत नाव? असे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे. पेंग्विनचे फोटो शेअर करत चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : हत्तीच्या पिल्लाला चंपा अन् माकडाला चिवा नाव ठेवू, महापौर पेडणेकरांचा भाजपला खोचक टोला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -