घरताज्या घडामोडीहमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या, चित्रा वाघ असं का...

हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या, चित्रा वाघ असं का म्हणाल्या?

Subscribe

महा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय, हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायरहै. असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नही फायर है असा पुष्मा सिनेमातील डायलॉग भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीविरोधात उच्चारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलं आहे. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात ५ जुलै रोजी विधानसभेत आमदारांना कायदा आणि नियम पायदळी तुडवून निलंबित करण्यात आले असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती अखेर न्यायालयाने आमदारांना दिलासा दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. यावरुन भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर घणाघात केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. तसेच यावेळी त्यांनी पुष्पा सिनेमातील डायलॉग ट्विट केला आहे. महा बिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलंय, हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॅावर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायरहै. असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

- Advertisement -

काय आहे नेमकं प्रकरण

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ५ जुलै २०२१ रोजी भाजपच्या आमदारांनी ओबीसी आरक्षणावरुन सभागृहात गदारोळ घातला. यावेळी अध्यक्षांसमोर असणारा राजदंडही पळवण्याचा प्रयत्न आमदारांनी केला. अध्यक्षांच्या चेंबरमध्ये देखील गैरवर्तन आणि शिवीगाळ झाला असल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आमदारांविरोधात केला. यामध्ये एकूण 12 आमदारांना निलंबित करण्यात आले होते. या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू जाणून घेऊन आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.

- Advertisement -

या आमदारांचे झाले होते निलंबन

अधिवेशनादरम्यान भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. यामध्ये आशिष शेलार, अभिमन्यू पवार, संजय कुटे, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अलवानी, हरिश पिंपळे, योगेश सागर, जयकुमार रावळ, नारायण कुचे, राम सातपुते आणि बंटी भांगडीया या आमदारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीने आक्रमक आणि विधानसभेत अधिक प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांवर कारवाई केली आहे.


हेही वाचा : १२ आमदारांच्या निकालावरुन केशव उपाध्ये अन् उर्मिला मातोंडकर यांच्यात ट्विटर वॉर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -