घरमहाराष्ट्रनोटीस मिळाल्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, स्त्रियांच्या अस्मितेची...

नोटीस मिळाल्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, स्त्रियांच्या अस्मितेची…

Subscribe

Chitra Wagh | उर्फी जावेदप्रकरणी चित्रा वाघ यांनी मोर्चा उघडला होता. याचप्रकणारत त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आता यावरून चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबाबत समाजात अविश्वास निर्माण केल्याबाद्दल आयोगाने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांना नोटीस बजावली आहे. उर्फी जावेदप्रकरणी चित्रा वाघ यांनी मोर्चा उघडला होता. याचप्रकणारत त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. आता या नोटिशीविरोधातच चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे.

हेही वाचा उर्फी प्रकरण चित्रा वाघांच्या अंगलट, महिला आयोगाकडून नोटीस

- Advertisement -

ट्वीट करत चित्रा वाघ म्हणतात की, स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा 56 नोटीशीत आणखी १ ची भर! जी सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करत फिरतीये तिला नोटीस द्यायला हवी तर तिला ती न देता हा नंगानाच होऊ देणार नाही… अशी भूमिका घेणारीला पाठवली… असो..छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात स्त्रियांच्या अस्मितेची आणि सन्मानासाठीची माझी लढाई अशीच सुरूच राहणार..!! जय हिंद …जय महाराष्ट्र …!!

- Advertisement -

महाराष्ट्र महिला आयोग महाराष्ट्राची कन्या तेजस्विनी पंडितला तिच्या पोस्टरवरून नोटीस पाठवू शकते, मात्र, भरस्त्यात लाईव्ह शो करणाऱ्या, नंगानाच करणाऱ्या मॉडेलला महिला आयोग नोटीस पाठवत नाही, असा हल्लाबोल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत केला. उर्फी जावेदच्या मुद्द्यांवरून चित्रा वाघ यांनी थेट रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला होता. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनीही आपला सडेतोड बाणा वापरत चित्रा वाघ यांनाच नोटीस बजावली आहे. दरम्यान, अभिनेत्री तेजस्विनी पंडितला आम्ही नोटीस पाठवलीच नव्हती, असा खुलासाही रुपाली चाकणकर यांनी केला.

हेही वाचा – पोस्टर नहीं, इधर लाईव्ह शो चल रहा है; चित्रा वाघ यांचा उर्फीवरून महिला आयोगावर निशाणा

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली नव्हती. ही नोटीस आम्ही अनुराधा या वेबमालिकेचे दिग्दर्शक संजय जाधव यांना पाठवली होती. या मालिकेच्या प्रमोशनसाठी शाळा, महाविद्यालयात पोस्टर्स लावण्यात आले होते. या पोस्टर्सवर तेजस्विनी पंडितचा धुम्रपान करतानाचा व्हिडीओ होता. यावरून विद्यार्थ्यांच्या पालकांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारींची दखल घेत आम्ही या मालिकेचे दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली. या नोटीसीला संजय जाधव यांनी उत्तरही दिले आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -