Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र Chuchgate Rape : शासकीय वसतिगृहांची सुरक्षा तपासणी; चंद्रकांत पाटलांचे आदेश

Chuchgate Rape : शासकीय वसतिगृहांची सुरक्षा तपासणी; चंद्रकांत पाटलांचे आदेश

Subscribe

 

मुंबईः राज्यातील सर्व शासकीय वसतीगृहांच्या सुरक्षेची तपासणी करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिले. यासाठी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

- Advertisement -

समितीने एका आठवड्यात शासकीय वसतीगृहांचे ऑडिट करावे व १४ जून २०२३ पर्यंत त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेशही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतीगृहात १९ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याने बलात्कार आणि हत्येचा संशय व्यक्त होत आहे. वसतीगृहाचा सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजियाने चर्नीरोड रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. पीडित मुलगी अकोल्याची आहे. वांद्रे येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयात ती शिकत होती. मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या खोलीत सापडला. मरीन ड्राईव्ह पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याने बलात्कार व हत्येचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजियाची आत्महत्या

- Advertisement -

वसतीगृहाचा सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजियाने चर्नारोड रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेकाली उडी घेऊन आत्महत्या केली. मरीन लाईन्स पोलीस मुलीवर अतिप्रसंग आणि तिची हत्या प्रकरणी चौकशी करत असताना त्यांना चर्नी रोड रेल्वे ट्रॅकवर कोणीतरी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाची ओळख पटवली असता त्यांना धक्काच बसला, कारण आत्महत्या केलेली व्यक्ती ओमप्रकाश कनोजिया होता. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी आरोपी ओमप्रकाश कनोजियाची ओळख पटवली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांचे डीसीपी प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहाची खोली उघडली असता तेथे मुलीचा मृतदेह आढळून आला. खोलीतून सर्व बोटांचे ठसे आणि इतर पुरावेही गोळा करण्यात आले आहेत. पोलिसांना या संदर्भात काही सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाले आहेत, ज्यानुसार ओमप्रकाश कनोजिया पहाटे ४.५५ वाजता वसतिगृहातून बाहेर पडताना दिसत आहे. अशा स्थितीत हत्येच्या घटनेनंतर ओमप्रकाश वसतिगृहातून बाहेर आल्याचा अंदाज पोलीस वर्तवत आहेत.

मुलीला चौथ्या मजल्यावर एकटचं का ठेवलं? अजित पवारांचा सवाल

पीडित मुलीला चौथ्या मजल्यावर एकटचं का ठेवलं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. अजित पवारांनी मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जी घटना मुलीबाबत घडली. तिचे आई-वडील त्यांच्या गावावरून आले आहेत. त्यांचा मुलगा सुद्धा येथे आला आहे. मुलाला पुण्यातील औंध येथे आयटीआयमध्ये प्रवेश मिळाला. तिथे त्याने त्याचा डीप्लोमा कोर्स पूर्ण केला आणि मुलगी येथे शिक्षण घेत होती. ४५० मुलींची व्यवस्था असणारं हे सावित्रीबाई फुले वसतीगृह आहे. परंतु याठिकाणी १० टक्केचं मुली राहतात. पण ही मुलगी चौथ्या मजल्यावर एकटीच राहत होती. वास्तविक ४५० मुली वसतीगृहात राहत असताना सगळ्याचं मुलींना एका मजल्यावर ठेवता आलं असतं. पण त्याबद्दलचं कारण काय?, या प्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. परंतु आरोपीने स्वत: रुळावर जाऊन आत्महत्या केल्यामुळे सर्वच प्रकारचे पुरावे नष्ट झाले, असा आरोप अजित पवार यांनी केला.

 

 

- Advertisment -