घरCORONA UPDATECoronavirus: जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांच्या रांगा, आता या गर्दीच करायचं काय?

Coronavirus: जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांच्या रांगा, आता या गर्दीच करायचं काय?

Subscribe

सरकारने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध असल्याचे सांगितले असूनही लोक मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये वस्तू खरेदीकरण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.

जगभरात करोनाने थैमान घातले आहे. देशात करोनाग्रस्तांची संख्या ८४२ वर पोहोचली आहे. राज्यातही ठाकरे सरकारने जमावबंदीनंतर आता संचारबंदी लागू केली आहे. मात्र नागरिकांना अजूनही या आजाराचे गांभिर्य समजल्याचे दिसत नाही. सरकारने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध असल्याचे सांगितले असूनही लोक मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये वस्तू खरेदीकरण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. किराणा स्टोअर, मेडिकल आणि दुध केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.


हेही वाचा – Corona Crisis: वाचा, महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत कोणकोणत्या गोष्टींवर बंदी आहे

- Advertisement -

जमावबंदीत १० पेक्षा जास्त तर संचारबंदीत ४ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. मग दुकानांच्या बाहेर जमणाऱ्या गर्दीचे काय? यावर पोलीस, सरकार काही अंकुश घालणार आहेत का? सराकरने जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले असतानाही लोक १०-१५ दिवसांचा किराणा एकत्र घेऊन ठेवण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी करत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे दुकानांमध्ये गर्दी जमू नये याकरता दुकानदार एकावेळी ४ ते ५ लोकांनाच आत प्रवेश देत आहेत. तर उर्वरीत लोक बाहेर रांगेत उभे असताना दिसत आहेत. गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात जवळपास १०-१२ जनरल स्टोअर्सची दुकाने खुली आहेत. तर दुध केंद्र आणि मेडिकल सेवाही उपलब्ध आहेत. मात्र यासाठी होणारी नागरिकांची गर्दी आटोक्यात येणे आवश्यक आहे.

shop

- Advertisement -

नागरिकांनी जबाबदारीने सरकारच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा सरकारला जमावबंदी, संचारबंदीनंतर होमअरेस्ट (घरबंदी)ची सक्ती करावी लागेल. असे केल्यास बाहेर थोड्याफार प्रमाणात येण्याजाण्याची जी मुभा आहे, ती देखील राहणार नाही. त्यामुळे लोकांनी गर्दी करणे टाळावे, हेच जनहिताते ठरणार आहे.

 

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -