घरताज्या घडामोडीइगतपुरीत कंपनीला लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी होणार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

इगतपुरीत कंपनीला लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी होणार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

Subscribe

नाशिकच्या इगतपुरी मुंढेगावाजवळ असलेल्या जिंदाल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. जिंदाल ग्रुपची पोलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीत आधी स्फोट झाला. त्यानंतर या स्फोटामुळे आग लागली. दरम्यान, इगतपुरीमध्ये झालेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. तसेच त्यांनी जखमी झालेल्या कामगारांची सुयश रुग्णालयात जाऊन चौकशी केली. यावेळी इगतपुरीत कंपनीला लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी होणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांनी सिल्लोडचा दौरा रद्द केला. त्यानंतर त्यांनी इगतपुरीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, या आगीत २ कामगारांचा मृत्यू झाला असून अन्य १७ कामगार जखमी झाले आहेत. या घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisement -

मिलिटरी टीम देखील काम करत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम संपूर्ण यंत्रणा करत आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ देखील या ठिकाणी पोहोचणार आहे. ज्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांना सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर जे जखमी आहेत त्यांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च सरकारच्या वतीने केला जाणार आहे. ही घटना मोठी असल्यामुळे त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : नाशिकच्या जिंदाल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; अनेक कर्मचारी जखमी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -