घरताज्या घडामोडीमाझ्याविरोधात कट करणाऱ्यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य

माझ्याविरोधात कट करणाऱ्यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली, अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य

Subscribe

मी काल केलेल्या वक्तव्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे. इगतपुरीत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे सर्व शासकीय यंत्रणा आणि स्वत: मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल झाले. मी कुणाचंही नाव घेतलं नाही आणि कुणाला काहीही बोललो सुद्धा नाही, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आज उद्घाटन झाले. यावेळी अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहे. मला कुणाचंही नाव घ्यायचं नाही. जे आले त्यांचं धन्यवाद आणि जे नाही आले त्यांचंही धन्यवाद…शेवटी हे कृषी प्रदर्शन आहे. हे कोणत्या आमदार, खासदार, पक्ष आणि जाती-धर्माचा नाही. माझ्याविरोधात कट करणाऱ्यांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. त्यांच्याकडे सर्व यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यामुळे याचं उत्तर मुख्यमंत्रीचं देतील. माझ्यासोबत काही घटना घडल्यानंतर त्या चार ते पाच मिनिटांत बाहेर येतात. त्यामुळे एक मनात शंका निर्माण झाली होती. ती शंका मी लोकांसमोर मांडली, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

- Advertisement -

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कुणीतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु आहे, असा गौप्यस्फोट अब्दुल सत्तार यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान, कृषी महोत्सवाच्या उद्घाटना प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये – 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -