घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री नांदेड, हिंगोली दौऱ्यावर; पूरग्रस्त हिंगोलीकरांची मदतीची अपेक्षा

मुख्यमंत्री नांदेड, हिंगोली दौऱ्यावर; पूरग्रस्त हिंगोलीकरांची मदतीची अपेक्षा

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड, हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात एकनाथ शिंदे नांदेडच्या उत्तर मतदारसंघातील पूरग्रस्त बाधित भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर नांदेडच्या अनेक भागात भेट देणार आहेत.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड, हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात एकनाथ शिंदे नांदेडच्या उत्तर मतदारसंघातील पूरग्रस्त बाधित भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर नांदेडच्या अनेक भागात भेट देणार आहेत. तसेच, हिंगोली येथे शिवसेना पक्षाची जाहीर सभा घेणार आहेत. मात्र, एकिकडे एकनाथ नादेड आणि हिंगोली दौऱ्यावर असताना मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी मदत करावी अशी अपेक्षा हिंगोली आणि नांदेडच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. (cm eknath shinde on nanded hingoli tour maharashtra today)

गेल्या काही दिवसांपासून नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. पाणी शिरल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच, शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या पूरग्रस्तांना आजच्या दौऱ्यात मुख्यमंत्री मदतीचा हात देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचा नांदेड दौरा

  • सोमवार 8 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11:15 वाजता मुंबई येथून विमानाने श्री गुरुगोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने गुरूद्वाराकडे प्रयाण.
  • सकाळी 11.30 ते 11.50 वाजेपर्यंत हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे राखीव.
  • दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत गोदावरी अर्बन बँकेस भेट. (संदर्भ खासदार हेमंत पाटील).
  • दुपारी 12.40 ते 1.15 वाजेपर्यंत नांदेड उत्तर मतदारसंघातील पूरग्रस्त बाधित भागाची पाहणी.
  • दुपारी 1.15 ते 1.45 वाजेपर्यंत भक्ती लॉन्स नांदेड येथील मेळाव्यास उपस्थिती.
  • दुपारी 1.45 ते 2.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव.
  • दुपारी 2.30 वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण.
  • रात्री 8.30 वा. हिंगोली येथून नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिंगोली दौरा

- Advertisement -
  • दुपारी 2.30 वाजता नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण.
  • दुपारी 3.15 ते 4.00 वाजता अग्रसेन चौक, नांदेड नाका, हिंगोली येथे भव्य कावड यात्रेस उपस्थिती.
  • 4.00 ते 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे राखीव.
  • संध्याकाळी 5.00 वाजता गांधी चौक, हिंगोली येथे शिवसेना पक्षाची जाहीर सभा.
  • संध्याकाळी 6.30 ते 6.45 वाजता फार्म हाऊस, सावरखेडा, हिंगोली येथे राखीव.
  • संध्याकाळी 6.45 वाजता हिंगोली येथून मोटारीने औढा नागनाथकडे प्रयाण.
  • संध्याकाळी 7.15 वाजता औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग दर्शन व राखीव.
  • संध्याकाळी 7.45 वाजता औंढा नागनाथ येथून बसमत मार्गे मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण.

हेही वाचा –  आज काय होणार; संजय राऊतांना ईडी की, न्यायालयीन कोठडी?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -