घरताज्या घडामोडीआज काय होणार; संजय राऊतांना ईडी की, न्यायालयीन कोठडी?

आज काय होणार; संजय राऊतांना ईडी की, न्यायालयीन कोठडी?

Subscribe

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी झाली असून त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानुसार, आज संजय राऊत यांची ईडी कोठडी संपणार आहे.

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी झाली असून त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानुसार, आज संजय राऊत यांची ईडी कोठडी संपणार आहे. त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यामुळे आजच्या सुनवणीत संजय राऊतांना दिलासा मिळणार की कोठडीत आणखी वाढ होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (maharashtra political shiv sena mp sanjay raut get bail or custody in patra chawl scam hearing will be held today)

संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने अटक केली. सुरूवातील सकाळी संजय राऊतांच्या घरी ईडीने छापेमारी केली. यामध्ये काही कागदपत्रे ईडीच्या हाती लागली. त्यानंतर ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेत, दक्षिण मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी नेले होते. त्यानंतर काही तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. सुरूवातील तीन दिवसांची ईडी कोठडी न्यायलयाने राऊत यांना सुनावली होती. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली.

- Advertisement -

संजय राऊतांच्या ईडी कोठडीत दुसऱ्यांदा वाढ झाल्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची शनिवारी चौकशी करण्यात आली. जवळपास 9 तास ही चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर त्यांनी सोडण्यात आले होते. या चौकशीत ईडीने या घोटाळ्यातील व्यवहारासंदर्भात त्यांना प्रश्न विचारले होते.

दरम्यान, संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने न्यायालयाकडे 8 दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र, संजय राऊत यांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करत राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांना 8 दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवालही उपस्थित केला होता.

- Advertisement -

त्यावर न्यायालने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीने पुन्हा एकदा कोठडी 10 ऑगस्टपर्यंत वाढवून मागितली होती. परंतु संजय राऊत यांचे वकील अॅड. मनोज मोहिते जिरह यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. त्यानंतर न्यायलयाने त्यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवली.


हेही वाचा –  राज्यातील ‘या’ भागांत पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -