घरताज्या घडामोडीराज्यात उद्योग वाढले पाहिजेत अशी आमची भूमिका, एकनाथ शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

राज्यात उद्योग वाढले पाहिजेत अशी आमची भूमिका, एकनाथ शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर

Subscribe

वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यासाठी जबाबदार कोण यावरून राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना टार्गेट करत आहेत. दरम्यान, राज्यात उद्योग वाढले पाहिजेत, लोकांना रोजगार मिळायला हवे, अशी आमची भूमिका असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमच्याकडून वेदांता-फॉक्सकॉनसाठी सर्व ऑफर दिल्या होत्या. विरोधकांनी स्वत: आत्मपरिक्षण करावं. प्रत्येक प्रकल्प राज्यात यावा, अशी आमची भूमिका आहे. तसेच राज्यात उद्योग वाढले पाहिजेत, लोकांना रोजगार मिळायला हवे आणि तरूणांच्या हाताला काम मिळायला हवं, अशी आमची भूमिका असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

- Advertisement -

वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावरून युवासेना उद्या राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये आंदोलन करणार असल्याचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी जाहीर केले. शिंदे-फडणवीस या खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला जाणार असल्याने आम्ही उद्या, 15 सप्टेंबरला राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योगमंत्र्यांचा ठाकरे सरकारवर ठपका

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारने कधीच वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला पॅकेज दिले नाही. मागील सरकारच्या काळात हाय-पॉवर कमिटीची बैठक देखील झाली नाही. ही बैठक झाली असती तर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेलाच नसता, असा दावा शिंदे गटातील नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारने कधीच वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला पॅकेज दिले नाही. मागील सरकारच्या काळात हाय पॉवर कमिटीची बैठक देखील झाली नाही. ही बैठक झाली असती तर वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प राज्याबाहेर गेलाच नसता, असा दावा उदय सामंत यांनी केला.


हेही वाचा : …तर वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प राज्याबाहेर गेलाच नसता, उदय सामंतांचा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -