उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला धनुष्यबाण कोणाचा? मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं हे उत्तर

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्हाला संपत्तीचा मोह नाही. कधीही नव्हता. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. आम्ही जे निर्णय घेतले त्याने ते घाबरले आहेत. बिथरले आहेत. त्यामुळेच ते आमच्यावर आरोप करत आहेत. आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ.

 

मुंबईः मी दिलेल्या गोष्टी काढत नाही. मला बोलायला लावू नका. मी बोललो तर अनेकजण अडचणीत येऊ शकतात, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नाव न घेता दिला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दाखवलेला धनुष्यबाण हा मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता, असे सांगितले जाते. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील इशारा दिला. त्या धनुष्यबाणावर मी काहीच बोलणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्हाला संपत्तीचा मोह नाही. कधीही नव्हता. आम्हाला कोणाचीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. आम्ही जे निर्णय घेतले त्याने ते घाबरले आहेत. बिथरले आहेत. त्यामुळेच ते आमच्यावर आरोप करत आहेत. आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ.

दरम्यान एमपीएससी उमेदवारांच्या आंदोलनाविषयी बोलताना झालेल्या चुकीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते की, “एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली, तिच भूमिका सरकारची देखील आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन पद्धतीबाबत काही सूचना आल्या आहेत. 2025 पासून जी नवी पद्धत सुरु करण्यात येणार होती, त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले असून त्यांना कळवले आहे.” विशेष म्हणजे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विषयावर एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं एकदा नव्हे तर तीनदा उच्चार केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नक्की काय म्हणायचं होतं? यावरून साऱ्यांचा गोंधळ उडाला होता.

अखेर ही चूक लक्षात येताच मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे येऊन केलेल्या व्यक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, एमपीएससीच्या प्रश्नावर आम्ही तोडगा काढतोय याबाबत मुलांनाही बोललो आहे. माध्यमांशी बोलताना माझ्याकडून एमपीएससीचा विषय सुरू असताना निवडणूक आयोग हे अनावधानाने बोलले गेले.” सध्या निवडणूक आयोग, कोर्ट या गोष्टी जोरात चालू असल्यामुळे असे चुकून शब्द झाल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.